1 min read

बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात संविधान दिन साजरा

Loading

बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात संविधान दिन साजरा

विद्यार्थ्यांनी केले संविधान उद्देशिकाचे वाचन

मुंबई (मनिलाल शिंपी) भांडुप येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले
भांडुप येथील भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात संविधान दिन आयोजित करण्यात आला होता. शाळेतील शिक्षक अनिल बोरनारे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
संविधान प्रास्ताविका सरनामा वाचनाचा उद्देश हा विद्यार्थी व नागरिक यांना संविधाना बद्दलची माहिती व्हावी. आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव व्हावी असा आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचा आणि राज्याचा कारभार कसा केला जातो. कसा करावा. याची माहिती मिळते. कार्यपालिका, मंत्रिमंडळ, न्यायपालिका, निवडणूक आयोग इत्यादींची माहिती मिळते. त्यातूनच जबाबदार नागरिक कसे होता येईल. हे ही समजते. संविधान म्हणजे आपली आचारसंहिता आहे. आचारातून आपल्याला शिक्षण मिळते. ते शिक्षण हे आपल्या जीवनाचा पाया आहे. म्हणूनच त्यांचे वाचन करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्यातूनच सर्व संविधान वाचण्याची व त्यातून प्रेरणा घेण्याची उर्जा मिळत असल्याचेही अनिल बोरनारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विनिता देसाई यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक गोरख व्हरकटे प्रियांका शिंदे आदी उपस्थित होते
भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वंदना पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *