1 min read

चुरशीचा लढतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी वेनुनाथ कडू यांची बाजी.

Loading

चुरशीचा लढतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी वेनुनाथ कडू यांची बाजी.

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची पुणे येथे शिक्षक भवनात राज्याध्यक्ष, राज्य सर कार्यवाह व राज्य कोषाध्यक्ष पदांची निवडणूक पार पडली .राज्यस्तरीय शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 299 पैकी 239 पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. राज्याध्यक्ष पदाकरिता उभे असलेले माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांना 36 मते मिळाली. मुख्याध्यापक सुनील पंडित यांना 90 मते मिळाली. तर वेनुनाथ् कडू यांनी 111 मते मिळवत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला.दोन मते बाद झाली.राज्य सर कार्यवाह पदासाठी अमरावतीचे राजकुमार बोनकिले निवडून आले.तर राज्य कोषाध्यक्षपदी कोल्हापूरचे राजेंद्र सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून माजी शिक्षक आमदार ना.गो. गाणार सर यांनी काम पाहिले.शिक्षक शिक्षकेतरांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा राज्यभर प्रवास करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी लढा देईन. असे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी सांगितले.कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, कोषाध्यक्ष पी. एम. पाटील उपाध्यक्ष सुविधा तावडे विजय भामरे तसेच विभागीय पदाधिकारी सुनील गौंड,ए. व्ही. पाटील, दीपक पाटील, गजानन भोसले, राजेंद्र दळे शिवाजी सांगडे ,सु.ल. पाटील तानाजी खोमणे, दीपक पाटील,विठ्ठल रेणुकर ,आप्पाराव कदम, गजानन भोसले, अरुण निळे,सुलक्षणा पाटील, मुग्धा पवार व उभारे सर यांनी कोकण विभागाच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *