1 min read

नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अग्रोवर्ल्ड कृषीप्रदर्शनद्वारे प्रकल्प अहवाल सादर

Loading

नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अग्रोवर्ल्ड कृषीप्रदर्शनद्वारे प्रकल्प अहवाल सादर …….

आज दिनांक

. ०४ ऑक्टोंबर रोजी निर्मलसीड्स यांनी आयोजित केलेल्या अग्रोवर्ल्ड कृषि प्रदर्शनाला अंमळनेर येथील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच पदवीप्रवेशित विद्यार्थी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी हितगुज केले. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे विविध औजारे त्यामध्ये सौर चलित पंप, ठिबक सिंचन साहित्य, कृषियांत्रिकीकरण औजारे विविध फळा-फुलांच्या रोपवटीका,पिकास अपायकारक असणारी विविध किड तसेच त्यांना नियंत्रित करण्यासाठी लागणारी औषधे यांचा समावेश होता,सौर चलित बैल हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते.या प्रकल्प अहवालासाठी संस्थेचं मानद संचालक प्राध्या.सुनील गरुड ,प्रशा.अविकारी प्रा श्याम पवार तसेच प्राचार्या डॉ.शुभांगी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तर अहवाल पूर्ण करण्यासाठी प्रा.संदीप साळुंखे,प्रा.अमोल घाडगे,प्रा.सुदीप पाटील,प्रा.महेश चव्हाण,प्रा.लक्ष्मण बोंद्रे,प्रा.शिवाजी गावित यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *