1 min read

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मंत्रालयावर काढणार ओवाळणी मोर्चा

Loading

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मंत्रालयावर काढणार ओवाळणी मोर्चा
राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर अप्पर सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,आयुक्त,आरोग्य सेवा तसेच मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याबरोबर बैठकी होऊन चर्चा झाल्या.
वरीप्रमाणे झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दोन हजार रुपये भाऊबीज देण्यासह भरीव मानधनवाढ करण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दि.०१ नोव्हेंबर रोजी केली.परंतू निर्णय कधी घेतला जाईल याबाबत ठोस सांगितले नाही.म्हणून संप सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला.
मा.आरोग्य मंत्र्यानी केलेल्या घोषणेप्रमाणे भाऊबीज भेट आणि मानधनवाढीचा शासकीय आदेश(GR) दिवाळीपूर्वी काढावा.यासाठी दि. ०८.११.२०२३ रोजी राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आझाद मैदान(मंत्रालय) मुंबई येथे ओवाळणी मोर्चा काढणार आहेत.
तरी सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी दि.०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आझाद मैदान मुंबई येथील ओवाळणी मोर्चात मोठ्या संख्येने भागीदारी करावी तसेच ओवाळणी मोर्चात येताना सर्वांनी ओवाळणीचे साहित्य ( ताट,निरंजन,नारळ,अक्षदा,कुंकू आदी ) सोबत आणावे आणि ओवाळणी मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन मायाताई परमेश्वर,रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *