1 min read

माळी समाजात मनोज जरांगे पाटील यांचा सारखा लढवय्या योद्धा असता तर प्रचंड प्रगती झाली असती!

Loading

माळी समाजात मनोज जरांगे पाटील यांचा सारखा लढवय्या योद्धा असता तर प्रचंड प्रगती झाली असती!

खेकडा वृत्तीचे माळी पुढारी एकमेकांच्या पाय खेचण्यात मग्न
——-प्रवीण महाजन
प्रचंड वेदना सहन करून वेळ प्रसंगी प्राणाची व परिवाराची पर्वा न करता समाजासाठी लढणाऱ्या योध्याची लढाई खऱ्या अर्थाने लढवय्या समाजाचा कार्येकर्ता च समजू शकेल गरजवंतांची लढाई मनोज जरांगे पाटील यांनी खऱ्या अर्थाने जिंकली! स्वतःची काळजी त्यांनी घ्यावी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांचे अनेक प्रसंग प्रसार माध्येमातून पाहतांना डोळे पाणावले….समाजासाठी एवढे प्रेम मी कधीही पाहिले नाही सर्वआंदोलक यांच्या कार्यास वंदन! इतिहासात या आंदोलनाची नोंद महत्वपूर्ण क्रांती घडवणारी आहे.असे फुले-शाहू-आंबेडकर विचारांची ज्वलंत संघटना क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य चे संस्थापक प्रवीण बी.महाजन यांनी मराठा आंदोलन विषयी आपले विचार सोशल मीडियाच्या माध्येमातून पत्रकाद्वारे आंदोलनास जाहीर पाठिंबा देतांना वेक्त केले.त्यांची पोस्ट राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड व्हायरल झाली. तळागळातील माळी समाज बांधवांनी सहमत दर्शवले आहे.माळी समाजात असा योद्धा असता तर प्रगती झाली असती माळी समाजातील पुढारी खेकडा वृत्तीचे एकमेकांचे पाय खेचणारे आहेत म्हणून समाज मागे आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *