1 min read

कल्याण डोंबिवली जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत मुलींचा संघाची उल्लेखनीय कामगिरी. मैदानी स्पर्धेत मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा::प्रविण कांबळे १४ वर्षाखालील नूतन ज्ञांनमंदिर चां हिरकनींची प्रथम क्रमांकावर झेप.तर होली रोझ इंग्लिश स्कूल टिटवाळा द्वितीय स्थानी..

Loading

कल्याण डोंबिवली जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत मुलींचा संघाची उल्लेखनीय कामगिरी. मैदानी स्पर्धेत मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा::प्रविण कांबळे १४ वर्षाखालील नूतन ज्ञांनमंदिर चां हिरकनींची प्रथम क्रमांकावर झेप.तर होली रोझ इंग्लिश स्कूल टिटवाळा द्वितीय स्थानी..

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा आयोजित करण्यात आला होती. क्रीडा संनियंत्रक कृष्णा माळी, दिनेश पवार, संजय तरे, मनिलाल शिंपी,पाटील बाल मंदिरचे तुपे सर यांचा उपस्थितीत क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे यांचा हस्ते १४ वर्षाखालील मुलींचा खो खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देताना कांबळे यांनी सांगितले की कल्याण डोंबिवली परसरातील जास्तीत जास्त शाळांमधून मुलींनी मैदानी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या स्पर्धेत २८ संघांनी सहभाग नोंदवला. चूर्शीचा अंतिम सामन्यात छत्रपती शिक्षण मंडळाचा कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदिर या संघातील मुलींनी उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन करत पहिला क्रमांकावर झेप घेतली. तसेच या चुरशीचा सामन्यात होली रोझ इंग्लिश स्कूल टिटवाळा या संघाने शेवटपर्यंत विजयासाठी झुंज देत द्वितीय क्रमांकावर बाजी मारली. विजयी संघाना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी विजेता आणि उपविजेता संघाला ५०० रुपयाचे रोख पारितोषिक देऊन कौतुक आणि अभिनंदन केले.यावेळी शिंपी समाज उपाध्यक्ष अरविंद शिंपी उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी के.रा कोतकर विद्यालयाचे संजय तरे , एस आय ए इंग्लिश स्कूलचे योगेश खोरगडे, ओमकार इंग्लिश स्कूल चा प्रतिभा जाधव, तसेच सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक व संघटक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण स्पर्धेच्या पंच म्हणून नियोजनासाठी तेजस सपकाळ, भारत नाईकनवरे,विनायक मिसाळ,शुभम नाईकनवरे,मानव मोरे,शुभम ढगळे, आदित्य,रितेश मुंडे, यांनी अतिशय चांगले निर्णय देऊन खो खो खेळाडूंना योग्य निकाल देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट निरीक्षण केले. विजेता संघ नूतन ज्ञानमंदिर कल्याण पूर्व,आणि उपविजेता संघ होली रोझ इंग्लिश स्कूल,टिटवाळा संघाचे प्रशिक्षक संतोष मुंडे, वैशाली वाबळे, श्रीमती प्रज्ञा म्हाळुंगे,यांच्यासह सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *