1 min read

सार्वजनिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया (असोदा) तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Loading

चित्रकला स्पर्धेत बक्षीसपात्र विद्यार्थिनी सोबत स्वर्णीम गजभिये, विलासराव चौधरी, डॉ. मिलिंद बागुल,व्ही. एल.वानखेडे, एल.जे. पाटील, मीनाक्षी कोल्हे भावना चौधरी.

सार्वजनिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया (असोदा) तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

असोदा – सार्वजनिक विद्यालयात युनियन बँक ऑफ इंडिया, असोदा तर्फे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.त्यात पहिल्या तीन क्रमांकांचे विद्यार्थी निवडण्यात आले होते त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. युनियन बँक ऑफ इंडिया, व्यवस्थापक स्वर्णेश गजभिये तर आव्हाणे येथील व्ही. एल .वानखेडे,मुख्याध्यापक डॉ .मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल.जे.पाटील,चित्रकला शिक्षक मिनाक्षी कोल्हे उपस्थित होते.मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविक केले प्रथम क्रमांक आदिती कोल्हे,द्वितीय क्रमांक रिया पाटील,तृतीय क्रमांक विभागून तृप्ती बिऱ्हाडे व प्रज्ञा कापडणे यांनी प्राप्त केला बक्षीसपात्र विद्यार्थिनींचे स्वर्णेश गजभिये साहेबांनी कौतुक केले.प्रज्ञा कापडणे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन भावना चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन मीनाक्षी कोल्हे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *