1 min read

पिंप्री – कृषी केंद्र महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयककाला विरोध..!कृषिकेंद्र संचालकांचा कडकडीत बंद….!

Loading

पिंप्री – कृषी केंद्र महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयककाला विरोध..!कृषिकेंद्र संचालकांचा कडकडीत बंद….!

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील सर्व कृषी केंद्र यांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयक क्रमांक 40,41,42, 43 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी कडकडीत बंद केला . तसेच येणाऱ्या काळात तीन दिवसांचा बंद दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून सफल करण्यात येणार आहे .शासनाच्या या जाचक अटींच्या बाबतीत लवकर निर्णय न घेतल्यास 5 नोव्हेंबर 2023 पासून आम्ही बेमुदत बंद करू असे प्रतिपादन मनोज मालू यांनी केले. पिंप्री येथील स्थानिक व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी शासनाच्या या धोरणाने कृषी व्यापार वर विपरीत परिणाम होणार असल्याचे सांगितले .त्याप्रसंगी पिंप्री खुर्द येथील डीलर्स फर्टीलायझर पेस्टिसाइड व सीड्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी गणेश चौधरी ,राजू बापू पाटील, ईश्वरलाल पाटील, मनोज मालू, मोहन शिंदे, विजय मालू, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *