1 min read

मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत सार्वजनिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न
शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांची उपस्थिती.

Loading

मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत सार्वजनिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न
शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांची उपस्थिती.
आपला देश हा दैदिप्यमान आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जगात ओळख निर्माण करणारा देश आहे या देशाची आपली असणारी माती तिचा सन्मान आपण करणे आवश्यक असून शेतीची माती, आपल्या घराची माती त्याच सोबत आपलं बालपण आणि एकूणच मातीशी असणारा लळा या गोष्टीचा विचार करता मातीशी असणार आपलं नातं घट्ट असं आहे आणि म्हणून याचा सार्थ असा अभिमान मेरी माटी मेरा देश याद्वारे आपण समाजात दृढ करणे आवश्यक असल्याचे मत माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा या ठिकाणी मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले. मेरी माटी मेरी सेल्फी या कार्यक्रमांतर्गत सोबतच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांनी भूषविले कार्यक्रमास सचिव कमलाकर सावदेकर, चेअरमन उद्धवराव पाटील, संचालक के. आर. चौधरी, दिलीप महाजन, दुर्गादास भोळे ,उपशिक्षणाधिकारी एजाज शेख, संजय पाटील, संचालक किशोर कोल्हे, वसंत चिरमाडे, सुनील चौधरी,पंडित चौधरी,गोपाळ भोळे, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे. पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन यांनी केले.आभार वृषाली चौधरी यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *