प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा
![]()

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रीय एकता शपथ घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण सर्वांनी राष्ट्रीय एकतेचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपण सर्व एकच आहोत ही भावना सर्वत्र रुजविणे आवश्यक आहे. तसेच सर्वांनी राष्ट्रीय विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, प्रा. डॉ. संदीप नेरकर (अधिसभा सदस्य), उपप्राचार्य प्रा. डॉ. जी.एच निकुंभ, डॉ. विजय मांटे, प्रा. जे.सी.अग्रवाल, डॉ. डी.आर. चौधरी, डॉ. एच.डी जाधव, डॉ. नलिनी पाटील, डॉ. विवेक बडगुजर, प्रा. योगेश पाटील , प्रा. रवींद्र मराठे, प्रा. किरण सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत पवार, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील राजपूत तसेच राष्ट्रीय सेवा योजनचे बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त व्याख्यान डोके. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांचे विचार युवा वर्गापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. असे मत केले. तसेच डॉ. धीरज वैष्णव यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत पवार यांनी केले तर प्रा. भाग्यश्री जाधव यांनी आभार मानले.

