1 min read

अभिनव विद्यामंदिर, शाळेस शिवतेज २०२३ आदर्श पुरस्कार

Loading

अभिनव विद्यामंदिर, शाळेस शिवतेज २०२३ आदर्श पुरस्कार
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
“शिवतेज २०२३” या सुंदर नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेतील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. सर्व शाळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत विविध नृत्य व नाट्य कार्यक्रम सादर केले. तसेच याच कार्यक्रमात काही आदर्श शाळांची निवड करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण या आपल्या शाळेचाही या पुरस्कारात समावेश होता. शाळेचे मुख्याध्यापक . संपत गिते यांना मा. श्री मंगलप्रभात लोढा(पर्यटन मंत्रालय,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री,महाराष्ट्र शासन) यांच्या शुभहस्ते “विशेष शाळा” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे शिवतेज 2023 या कार्यक्रमात अभिनव विद्यामंदिर, पारनाका,कल्याण शाळेने सादर केलेल्या पोवाड्यास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. शाळेतील शिक्षक सुदर्शन खांबल आणि प्राथमिक व माध्यमिक चे सर्व सहकारी शिक्षक यांनी हा पोवाडा सादर केला होता.
शाळेला मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने प्राप्त झाला आहे असे प्रतिपादन मा. मुख्याध्यापक संपत गिते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *