1 min read

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न.

Loading

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा मेळावा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन केलेल्या " महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक" संघटनेचा मेळावा कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बदलापूर येथे संपन्न झाला. मेळाव्यात संघटनेची ध्येय, धोरणे ठरवण्यात आली, सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सांगितले,ज्या नेत्यांनी व 33 संघटनांनी मला पाठिंबा देऊन, "शिक्षकांचा आमदार शिक्षक व्हावा" यासाठी प्रयत्न केले त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही, केवळ कोकण विभागातील नाही तर राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्यरत राहणार आहे, सल्लागार समितीच्या वतीने कोकण विभागातील तालुक्याचा दौरा करून मेहनती आणि संघटनेला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभारली जाणार आहे, अडचणीत असणाऱ्या प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर आणि संस्थेला संघटनेची मदत होईल, असं कार्य कार्यकर्त्यांचे राहील, ज्ञानासाठी सदैव जागू! हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून "शाळा वाचवा शिक्षक वाचवा " हे उद्दिष्ट ठेवून संघटनेचे सर्व पदाधिकारी काम करतील, शिक्षक व विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवले जातील, शैक्षणिक अडी- अडचणीना वाचा फोडण्याचे काम केले जाईल, या संघटनेचा मेळावा दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला होईल, असेही आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी जाहीर केले, आमदारकीच्या आठ महिन्यात हजारो शिक्षकांची वैयक्तिक कामे करून दिली आहेत, 82 शिक्षक -शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्त्वावरील मान्यता मिळवून दिले व पगारी सुरू करून दिला आहे अनुदान,पेन्शन, अर्धवेळ, शिक्षक वाढीव पदे, आयटीआय शिक्षकांचे प्रमोशन, डिग्री कॉलेजचे प्रश्न आश्रम शाळांचे विविध प्रश्न, प्राथमिक शिक्षकांचे, विविध प्रश्न, दिव्यांग शाळा, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रश्न अधिवेशनात मांडून सोडवलेले आहेत, प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा केला जाणार आहे व येथे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. शैक्षणिक प्रश्न सोडवताना कुठल्याही कामात कधीच कमी पडणार नाही, जमिनीवर राहूनच माझे कार्य प्रामाणिकपणे पूर्ण करेल, कामाचा व्याप वाढल्याने, सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क होत नाही, त्यामुळे गैरसमज न करता संघटना वाढण्यासाठी व माझे हात बळकट करण्यासाठी सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत राहू द्या! असे मत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मनोगतातून व्यक्त केले. मेळाव्यासाठी ठाणे, पालघर, रायगड मधील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, लवकरच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी साठी स्वतंत्र मेळावा घेण्यात येईल* *मंचावर संघटनेचे सल्लागार रमेश जाधव सर, चंद्रकांत पवार सर, एल आर पाटील सर, माणिक दुतोंडे सर, विष्णू विशे सर,जगन्नाथ खारीक सर, आनंद पवार सर, संजय भगत सर, लखीचंद ठाकरे सर, लतेश नांदगावकर मामा, गुलाब दवणे सर, रमेश बुटेरे सर, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील सर,पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डिमेलो सर, अरुण भोईर सर, विठ्ठल गोरे सर, रमेश बुटेरे सर, पतपेढीचे संचालक सुरेश सापळे,प्रशांत भामरे, धनाजी दळवी, शैलेश भोईर, दिगंबर बेंडाळे, संगीता पाखले, संस्थाचालक संघटनेचे महेंद्र पाटील, गजानन पाटील, केशव पाटील, राजनारायण तिवारी, कमलाकर वारे सर, गोकुळ पाटील,अनिल पाटील निर्भय म्हात्रे, बबन पाटील, ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संस्थाचालक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *