1 min read

कल्याण येथे १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा यशस्वी.

Loading

कल्याण येथे १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा यशस्वी.

प्रथम क्रमांकावरअव्वलस्थानी बी.के.बिर्ला कॉलेजची बाजी, द्वितीय क्रमांकावर के. व्ही.पेंढारकर ची चुरशीची लढत. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व क्रीडा संघटक आणि क्रीडा शिक्षक यांचे सहकार्य आणि योगदान मोलाचे आहे ::क्रीडास्पर्धा नियंत्रक कृष्णा माळी

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ):कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२३-२४
स्पर्धेचे आयोजन सेठ हिराचंद मुथा स्कूल कोळीवली, उंबर्डे, कल्याण पश्चिम येथे करण्यात आले होते.
कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी मुथा स्कूल चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मुथा यांचा प्रमुख उपस्थितीत तसेच क्रीडा पर्यवेक्षक प्रविंण कांबळे , स्कूलच्या प्राचार्या सपना गादिया,उपप्राचार्या दीपाली कांबळे, कॉलेज चे प्राचार्या अनुजा ब्रम्हे स्पर्धा सहनियंत्रक कृष्णा माळी, विजय सिंग , खेळ प्रमुख सुभाष पंजे , पार्थ त्रिवेदी,आर एस पी अधिकारी युनिट कमांडर,आणि पत्रकार डॉ. मनिलाल शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले, या स्पर्धेत पहिल्या दिवशी 19 वर्षाखालील मुले जवळ जवळ संघाचा विद्यार्थ्यांचा सहभाग होता स्पर्धा अतिशय सुंदर रित्या पार पाडली
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे स्थान बी.के. बिर्ला कॉलेज कल्याण यांनी पटकावले,
द्वितीय क्रमांक के व्ही पेंढारकर कॉलेज,आणि तिसऱ्या क्रमांकाचा मॉडेल ज्युनिअर कॉलेज शर्यतीत आणि मंजुनाथ विद्यालय यांचात चुरशीची लढत झाली, यामध्ये मंजुनाथ विद्यालयाने तृतीय स्थान पटकावले. यावेळी मॉडेल कॉलेजचे क्रीडा संघटक सुभाष गायकवाड, व लांडगे सर, उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळ प्रमुख म्हणून मुथा कॉलेज चे क्रीडा संघटक सुभाष पंजे यांच्यासह सर्व पंच मंडळींनी खूप परिश्रम घेतले. कल्याण डोंबिवली क्रीडा नियंत्रक कृष्णा माळी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच स्पर्धा सुरळीत पार पडत आहेत, सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मला कल्याण डोंबिवली मधील माझे सर्व सहकारी क्रिडा शिक्षक, क्रीडा संघटक,तसेच सर्व क्रीडा संघटनेचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य आणि महत्त्वपूर्ण योगदान आहे.असेही कृष्णा माळी यांनी सांगितले. विजयी संघांचे आयोजक, संयोजक आणि कल्याण डोंबिवली क्रीडा विभागातर्फे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *