1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या अमृत कलश संकलन कार्यक्रमासाठी निवड

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या अमृत कलश संकलन कार्यक्रमासाठी निवड

अमळनेर : ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत दिल्ली येथे कर्तव्य पथावर ‘अमृत कलश’ संकलनानिमित्त प्रताप महाविद्यालयाचा रा.से.यो. स्वयंसेवक अमोल पाटील याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. दिल्लीसाठी ते रवाना होत आहेत. त्यासाठी महाविद्यालयाचा अमृत कलश दि.२८ रोजी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. जैन यांनी रा.से.यो स्वयंसेवक अमोल पाटील याच्याकडे सुपूर्द केला व शुभेच्छा दिल्या. संचालक सीए. नीरज अग्रवाल, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, सर्व उपप्राचार्य, अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील राजपूत , महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *