प्रा. किरण गावीत यांना पीएच. डी प्रदान
![]()

प्रा. किरण गावीत यांना पीएच. डी प्रदान
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रा. किरण गावीत यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून प्र. कुलगुरु डॉ. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते पीएच.डी अधिसूचना प्रमाणपत्र (नोटिफिकेशन) प्रदान करण्यात आले.
प्रताप महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली त्यांनी Landuse classification and planning of Lower Girna Basin in Jalgaon district (MS) Using Remote sensing and GIS environment या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता.
यापूर्वी त्यांनी भूगोल विषयात नेट,सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच भूरुपशास्त्र, Physical Geography-I, Physical Geography -II, प्राकृतिक भूगोल, इत्यादी संदर्भ ग्रंथांचे (डॉ. एस. आर.चौधरी यांच्यासमवेत) सहलेखक म्हणून ग्रंथ निर्मिती केली आहे. तसेच इस्रोची प्रशिक्षण संस्था भारतीय सुदूर संवेदन संस्था(IIRS) देहरादून येथून सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली (RS & GIS) या विषयावर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
भूगोल विभाग प्रमुख डॉ. कैलास निळे, प्रा. बी. व्ही. देशमुख, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ.महेंद्र महाजन आदींचे त्यांना सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव,उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.एच.निकुंभ, प्रा.डॉ. कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा.डॉ. विजय मांटे, आयक्युएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, प्रा.डॉ.संदीप नेरकर, डॉ विलास गावीत, डॉ. अनिल झळके, प्रा. अमित शिरसाठ, प्रा. चंद्रशेखर वाढे, प्रा. भूषण पाटील, प्रा चंद्रकांत जाधव, प्रा राजेशकुमार पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रविण धनगर, बाळा राजपूत, यांनी अभिनंदन केले.

