1 min read

नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न ———-!

Loading

नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न ———-!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन(
अमळनेर येथील श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्रस्तरीय साक्षरता अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर प्रसंगी शहरी विभागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील निवडक शिक्षकांसाठी नवभारत साक्षरता अभियानाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी अमळनेर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय रावसाहेब पाटील आणि नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी दिपाली पाटील मॅडम व सुनील पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक 27 व 28 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख भगवान पाटील सर यांनी नवभारत साक्षरता अभियान म्हणजे काय ? का? कशासाठी? असाक्षर म्हणजे काय? आणि स्वयंसेवक यांनी असाक्षरांना साक्षर करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. असाक्षरांसाठी कशाप्रकारे आपले वागणे असावे ? आणि असाक्षरांना स्व अनुभूती कशी येईल! याविषयी सविस्तर माहिती संबंधित उपस्थित शिक्षक बंधू भगिनी यांना देण्यात आली .त्यानंतर श्री डी. ए. सोनवणे व रईस अहमद शेख अब्दुल्ला, मोहम्मद साबीर अब्दुल मुनाफ यांनी गटकार्य घेऊन सादरीकरण करून घेतले. आणि ऑनलाइन लिंक देऊन दहा प्रश्नांची सोडवणूक उपस्थित प्रशिक्षणार्थी बंधू-भगिनींकडून करून घेतली. अशा प्रकारे दोन दिवसीय नवभारत साक्षरता अभियानाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *