1 min read

विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा नूतन शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धार

Loading

विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा नूतन शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्धार
आज माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे श्रीमती डॉ. किरण कुवऺर मॅडम यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्याबद्दल. त्यांचा विविध संघटनांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चर्चा करताना जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार व अप्रगत विद्यार्थ्यांना गुणवत्ता साधण्यासाठी शाळा व शिक्षकांच्या सहकार्यातून गुणवत्ता विकास घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी विविध संघटनांचे शिक्षक समन्वय समिती प्रतिनिधी म्हणून श्रीमती डॉक्टर किरण कुवर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.जळगाव यांचा सत्कार व चर्चा करताना..जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल (मुख्याध्यापक सार्वजनिक विद्यालय आसोदा), श्री तुळशीराम सोनवणे (संचालक जळगाव जि.पू. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची पतपेढी), चेतन न्हाळदे सर(पर्यवेक्षक भोकर विद्यालय),एल जे पाटील सर (पर्यवेक्षक असोदा) , प्रशांत कोल्हे सर (विभागीय अध्यक्ष क्रीडा संघटना),संतोष कचरे (जि. सरचिटणीस कर्मचारी संघटना), प्रेम झवर ( वरिष्ठ लिपिक भोकर), श्री लक्ष्मण भुगवड्या सर, श्री शशिकांत राणे राजपूत सर, श्री सचिन जंगले सर (सार्वजनिक विद्यालय असोदा) व आदरणीय शेख साहेब (उपशिक्षणाधिकारी जळगाव) व आदरणीय रियाज तडवी साहेब (अधीक्षक जि.प.जळगाव) हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *