1 min read

यशवंत श्रावण शिंगाणे यांचे वृद्धापकाळाने निधन

Loading

यशवंत श्रावण शिंगाणे यांचे वृद्धापकाळाने निधन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- निम हायस्कूलचे उपशिक्षक सुनील शिंगणे यांचे वडील यशवंत श्रावण शिंगाणे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले ते 81 वर्षांचे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षक असतांना 34 वर्ष अध्यापनाचे काम केले. अत्यंत शांत व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या दोन मुलांना व एका मूलीला शिक्षणाचे संस्काराचे योग्य बाळकडू देऊन त्यांना उच्चशिक्षित केले. दोन्ही मूले शिक्षकी पेशामध्ये ते इमाने इतबारे कार्य करत आहेत .त्यांना दोन मुले एक मूलगी आहे. एक मूलगा सुनील शिंगाने हे निम हायस्कूल येथे शिक्षक तर एक अनिल शिंगाणे हेही धरणगाव तालुक्यातील साळवा हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत.
एक कवी म्हणतो…
जीवन हे क्षणभंगुर आहे
हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तीची आठवण कायम सोबत राहते..
अशा पद्धतीने सुनिल शिंगाणे,अनिल शिंगाणे परिवाराने वडीलांची मनोभावे सेवा केली.त्यांच्या मागे पत्नी, दोन मूले,एक मूलगी,जावाई,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
कै यशवंत शिंगाणे यांना नीम हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल चौधरी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्याविहार कॉलनीतील संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्राध्यापक आर बी पवार, साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे माननीय संचालक आर.बी पाटील,मा.सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील
,व विदयाविहार कॉलनीतील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *