1 min read

उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना माळी समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिक माळी भूषण व महात्मा फुले फौंडेशन यांच्या वतीने समाज भूषण पुरस्कार २०२३ प्रदान…..

Loading

उल्हासनगर येथील जनसेवक डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना माळी समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिक माळी भूषण व महात्मा फुले फौंडेशन यांच्या वतीने समाज भूषण पुरस्कार २०२३ प्रदान…..
मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी भूषण महाजन – माळी समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिक माळी भूषण व महात्मा फुले फौंडेशन यांच्या वतीने अमळनेर(जळगांव) येथील माळी समाज पंच मढीत महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री व ओबीसींचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या माळी समाज निर्धार मेळाव्यात सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उल्हासनगर येथील जनसेवक,अध्यक्ष श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ मुंबई, कौन्सिल सदस्य जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सी तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त डॉ.प्रा. प्रकाश माळी सर यांना समाज भूषण पुरस्कार २०२३ मा. शिरीष चौधरी माजी आमदार,भरत भाई माळी माजी नगराध्यक्ष तळोदा, बाळासाहेब कर्डक प्रांताध्यक्ष समता परिषद, ज्ञानेश्वर महाजन माजी नगराध्यक्ष धरणगाव, नाना महाजन जि.प.सदस्य, शालिग्राम मालकर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ, बाबुराव घोंगडे अध्यक्ष केंद्रीय माळी समाज सुधार मंडळ, अनिल निळे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महात्मा फुले समता परिषद, सतिश महाजन जिल्हाध्यक्ष समता परिषद, ए.के.गंभीर अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात, सुदाम महाजन सेवानिवृत्त अप्पर तहसीलदार यांच्या शुभहस्ते तसेच निळकंठ महाजन माजी अध्यक्ष श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात, प्रकाश महाजन उपाध्यक्ष मुंबई माळी समाज मंडळ, सौ.रेखा महाजन अध्यक्षा महिला मंडळ मुंबई, गुलाब महाजन माजी उपसचिव मुंबई माळी समाज मंडळ, सौ.पुष्पा महाजन माजी अध्यक्षा महिला मंडळ मुंबई, सौ. रोहिणी माळी माजी उपाध्यक्षा महिला मंडळ मुंबई, मुरलीधर महाजन अंतर्गत हिशोब तपासनीस मुंबई माळी समाज मंडळ, गणेश महाजन अध्यक्ष संत सावता माळी सेवा मंडळ, सौ. मंगलाबाई चव्हाण अध्यक्षा महिला मंडळ अमळनेर सौ. संध्या महाजन अध्यक्षा महिला मंडळ चोपडा व प्रा. भिमराव महाजन संपादक मासिक माळी भूषण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथील विविध गावातील माळी समाज मंडळ, महिला मंडळ व नवयुवक मंडळ यांचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य व समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *