1 min read

समुह शाळा, दत्तक शाळा योजनेविरोधात शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन

Loading

समुह शाळा, दत्तक शाळा योजनेविरोधात शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन

मुंबई :ठाणे (मनिलाल शिंपी) समूह शाळा व दत्तक शाळा योजना रद्द करावी यासाठी मुंबईत शिक्षकांनी धरणे आंदोलन करून हे निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली.मुंबई आणि मुंबई उपनगर माध्यमिक शिक्षक संघाने चेंबूरमधील शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनात संघाचे अध्यक्ष सतीश इनामदार, सचिव नानासाहेब पुंदे, मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे भाऊसाहेब घाडगे यांच्यासह उषा चव्हाण, ज्योती गांधी, मंगला चव्हाण सुधाकर तिवारी, किसन मोरे, तुकाराम पाटकर वैभव ठुबे मारुती पाटील सुजाता पाटील नीता शिंदे प्राजक्ता मोकल आश्विनी खेडकर मेघा भोसले केतन निपुरते प्रभाकर भोईटे नाना राजगे संतोष कानचर अशोक पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.समूह शाळा विकसित करणारे निर्णय रद्द करुन राज्यातील कमी पटाच्या संख्येच्या वाड्यावस्तीच्या शाळांना संरक्षण देण्यात यावे शिक्षणाचे कंपनीकरण थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जातील.
समूह शाळा योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील डोंगराळ आदिवासी व दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद पडून विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींचे शिक्षण बंद पडून लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची भीती निर्माण झाली असून तातडीने हे निर्णय मागे घेण्यात यावे.
अशी मागणी अनिल बोरनारे
अध्यक्ष मुंबई मराठी अध्यापक संघ यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *