1 min read

आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांवर आज श्री.धिरजकुमार आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक यांच्याशी सकारात्मक चर्चा संपन्न परंतु ठोस निर्णय नाही

Loading

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना

आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांवर आज श्री.धिरजकुमार आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक यांच्याशी सकारात्मक चर्चा संपन्न परंतु ठोस निर्णय नाही

आरोग्य मंत्री यांच्याशी बैठक घडवून आणण्याचे दिले आश्वसन

राज्यभर दिनांक 18.10.2023 पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या सोडविणेसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे.संपाच्या पार्श्भूमीवर आज दिनांक 26.10.2023 रोजी सकाळी 10.30 वाजता संघटनेच्या पदाधिकऱ्यांसोबत आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक मा. श्री.धीरजकुमार यांनी आरोग्य भवन मुंबई येथील त्यांच्या दालनात बैठक घेतली. सदर बैठकीत आशाताई व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली सदर गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा मिळेपर्यंत कंत्राटी कर्मचार्‍ याप्रमाणे वेतन व लाभ लागु करावे,आशाताई आणि गटप्रवर्तक यांना ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये,आशा व गटप्रवर्तकांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी भाऊबीज भेट लागू करावी,गटप्रवर्तकांना गटप्रवर्तक ऐवजी आशा सुपरवायझर संबोधण्यात यावे,आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात तिप्पट वाढ करावी, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना डिलिव्हरी आणि आजारपणाची रजा द्यावी,आशा स्वयंसेविका व गट प्रवर्टकांना सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून सेवा निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी यासह अन्य प्रलंबीत मागण्यावर सविस्तर चर्चा झाली. यावर श्री.धीरकुमार यांनी आशाताई व गटप्रवर्तक यांना आभा कार्ड,गोल्डन कार्ड, EKYC आणि अन्य ऑनलाईन कामाची सक्ती न करणेबाबत जिल्हा परिषद, नगर पालिका,नगर पंचायत महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाला तातडीने आदेश दिले जातील आणि सक्ती करण्यात येणार नाही,भाऊबीज देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे,गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणेबाबतचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल तसेच ठोस निर्णय होणेसाठी दि.३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत मा.श्री.डॉ.तानाजी सावंत मंत्री सार्वजनिक आरोग्य यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन मा.आयुक्त यांनी बैठकीत दिले. बैठकीत *सहसंचालक (अतांत्रिक) श्री.सुभाष बोरकर,राज्य समन्वयक(आशा योजना) श्रीमती स्वाती पाटील- शिंदे आपल्या संघटनेच्यावतीने राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील,सौ.सुनंदा पाटील* यांचेसह विविध प्रतिनिधींनी भागिदारी केली. चर्चा सकरात्मक झाली परंतू ठोस निर्णय झाला नाही. म्हणुन संप तूर्त सुरुच ठेवावा असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. आपले स्नेही

माया परमेश्वर
युवराज बैसाणे
रामकृष्ण बी.पाटील
सुधीर परमेश्वर
अमोल बैसाणे
दत्ता जगताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *