अनुश्री महिला बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौ संगिता महाजन यांना
भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड..
![]()
अनुश्री महिला बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सौ संगिता महाजन यांना
भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ज्या लोकांनी कोरोना काळात एवढ्या मोठ्या महामारीच्या संकटामध्ये ज्यांनी आपले स्वतःचा जीव आपली मूळ बाळ आपलं कुटुंब अक्षरशः यावर तुळशीपत्र ठेवून समाजातील घटकांसाठी आपला जीव धोक्यात घालून माणूसकि जपत आपली मराठी संस्कृती चा वारसा जपून ठेवला. अशा लोकांचा सन्मान करणे म्हणजे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील अशा विविध ठिकाणातून जिल्ह्यातून ,तालुक्यातून, खेड्यातून, गावातून अशा किती आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ,शाळेतील शिक्षक शिक्षिका ,पोलीस प्रशासन अशा अनेक प्रशासन कर्मचारी यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या वेळी गावातील घरोघरी जाऊन त्यांचे सर्वेक्षण केले .व माणूसकिचे नाते जपले
तसेच या लोकांचा गौरव व सन्मान केला जातो त्यात कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता वामनराव महाजन यांची भारत भूषण पुरस्कारासाठी निवड
अनुश्री महिला बहुउदेशीय सामाजिक
संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई इंगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संगीता प्रमोद महाजन यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत निवड केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां, उपेक्षित तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी शासनाला जाब विचारात वेगवेगळया आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे.
सौ संगिता प्रमोद महाजन या
संस्थापक अध्यक्षा- दिव्य आसरा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनेक तळागाळातील लोकांसाठी न्यायासाठी कटिबद्ध राहिलेले आहेत कोरोना काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक मदतीचा हात दिलेला आहे दिव्या आसरा या फाउंडेशनच्या वतीने त्यांचे सर्व पदाधिकारी नेहमीच सामाजिक कामाला प्राधान्य देत असतात. त्यांचे संस्थेच्या माध्यमातून काम ग्रामीण शहरी भागात सुरू आहे. पुढे राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश होणार असून 2024 च्या निवडणुकीत त्या इच्छुक आहेत.
एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा मतदाराचा कयास आहे.यांच्या या चांगल्या उत्कृष्ट कार्याचा अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेने घेतला व त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .त्यांचे दिव्य आसरा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी,कळमसरे ग्रामस्थ मंडळ यांनी अभिनंदन केले आहे..


