1 min read

जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन-रोहिणी खडसे

Loading

जळगाव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन-रोहिणी खडसे
जळगाव आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी भगीरथ केशरलाल सोमाणी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा ता जि जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारणीची मिटिंग कार्याध्यक्ष रोहिणीताई खडसे आयोजित केली होती सदर सभेत कार्याध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी सर्व शैक्षणिक संस्थाचालकांनी जळगाव जिल्हा संस्थाचालकांना सभासद होण्याचे आवाहन केले सर्वप्रथम मीटिंगमध्ये संघटनेचे मयत सभासद तसेच शिक्षण क्षेत्रातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर मागील सभेची इतिवृत्त मंजूर करण्यात आले पवित्र पोर्टल मध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे त्याचबरोबर शिक्षक भरतीवरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी कंत्राटी भरती प्रक्रिया कायमस्वरूपी थांबवावी शाळादत्तक समूह योजना रद्द करावी थकीत वेतनेतर अनुदान तात्काळ अदा करावे त्याचबरोबर बिंदू नामावली पडताळणी प्रक्रियेला चालना देऊन नाशिक विभागीय स्तरावरून रोस्टर अद्ययावत करून तात्काळ मिळावे व त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे या संदर्भात शासन स्तरावर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी रोहीणीताई खडसे यांची निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच संस्थाचालक संघटनेचे सदस्य शैलेश राणे यांची जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी वर संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. सभेस अध्यक्ष जयवंतराव पाटील उपाध्यक्ष जीवन खिवसरा सरचिटणीस संजय सोमाणी चिटणीस शकील ‘पटेल सदस्य मधुकर पवार राजेंद्र महाजन विजय कोटेचा शैलेश राणे डॉ नरेंद्र कोल्हे, घनश्याम बडगुजर बाळासाहेब देशमुख निलेश खलसे बारी जी एम महाजन प्रा सुनील गरुड आदी मान्यवर उपस्थित होते संस्थाचालक संघटनेचे सदस्य होण्यासाठी मनोज वाघ 9423974751 व संस्थाचालक संघटनेचे सरचिटणीस संजय सोमाणी 9422279094 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *