प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद संपन्न
![]()

प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद संपन्न
अमळनेर प्रतिनिधी येथील प्रताप महाविद्यालयात रुसा अंतर्गत गणित व संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ‘रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन सी .ए .नीरज अग्रवाल तर अध्यक्ष संस्थेचे चिटणीस तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी .जैन होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपाध्यक्ष माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक हरी भिका वाणी, सिनेट सदस्य डॉ.संदीप नेरकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ.जी एच निकुंभ, डॉ.कल्पना पाटील, डॉ.जे. बी. पटवर्धन, प्रा .पराग पाटील, प्रा.डॉ.व्ही बी. मांटे, उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कबचौ उमविचे माजी प्रथम कुलगुरू डॉ. एन के ठाकरे यांनी गणिताचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. म्हणाले की, ‘आयुष्य हे एक गणित आहे आणि ते प्रत्येकाला उलगडता आले पाहिजे. गणिताविषयी सैद्धांतिक अंगाने मांडणी केली. यावेळी त्यांनी अहिराणी भाषेतील कविता सादर केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गणित विषयासाठी प्रा. डॉ.एस .आर .चौधरी, प्रा. डॉ. विश्वास खरे, प्रा. डॉ. एच.एस.रामने हे संसाधन व्यक्ती म्हणून लाभले. तसेच संख्याशास्त्र विषयासाठी प्रा.डॉ. वि.ए. कळमकर, डॉ. व्ही बी घोटे, डॉ. आर. एल .शिंदे हे संसाधन व्यक्ती म्हणून लाभले लाभले. गणित व संख्याशास्त्र विषयासाठी एकूण ४४ संशोधकांनी संशोधन संशोधन पेपर सादर केले. तर १५ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी पोस्टर सादर केले.
सदर राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता सूर्यवंशी यांनी केले तर आभार रोहन गायकवाड यांनी मानले. तसेच समारोप सोहळ्यासाठी प्रा. डॉ.किशोर पवार विद्या परिषद सदस्य, डॉ एच एल तिडके, डॉ.सी. टी आगे (गणित विभाग, कबचौ उमवि जळगाव) हे उपस्थित होते. समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.वंदना भामरे व आभार डॉ.नलिनी पाटील यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. एम. पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले. पोस्टर प्रेझेंटेशनसाठी गणित विभागातून प्रा. एम.डी. सूर्यवंशी, एस. एस.व्ही. पी. एस. कॉलेज धुळे यांनी संख्याशास्त्र विषयासाठी तर डॉ.आर एल शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच या कार्यक्रमाला गणित व सांख्यिकी विभागाच्या प्रा.डॉ.पी बी भराटे, प्रा.जे.सी. अग्रवाल प्रा. जे.बी. जैन, प्रा.उमेश येवले, प्रा. प्रीती पाटील, प्रा.रुचिता पाटील, प्रा प्रियंका पाटील, प्रा. सलोनी पाटील, प्रा. कल्याणी पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

