२७ आँक्टोबरला प्रताप महाविद्यालय स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन
![]()

२७ आँक्टोबरला प्रताप महाविद्यालय स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस अंतर्गत दिनांक २७ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील गुजरात, गोवा अशा राज्यातील विद्यापीठातून तसेच मासाचूसेटस USA या परदेशी विद्यापीठातून देखील शोधनिबंध प्राप्त झालेला आहे. परिषदेस आत्तापर्यंत १७१ शोधनिबंधांचे सारांश प्राप्त झालेले आहे. अशाप्रकारे परिषदेत उत्तुंग असा प्रतिसाद मिळत आहे. प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक प्राध्यापक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय सेनगुप्ता CSIR (नवी दिल्ली), प्रमुख अतिथी म्हणून माजी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर (कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) व संसाधन व्यक्ती म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिलीप बडगुजर, (उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा,पुणे), शास्त्रज्ञ डॉ. दिनेश सावंत (राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे), प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील (मुंबई विद्यापीठ, मुंबई) आदी उपस्थित राहणार आहेत. सदर परिषदेच्या वतीने प्रताप महाविद्यालय हे आपल्या खानदेशातील अभ्यासू विद्यार्थी व संशोधक यांच्यासाठी ज्ञानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. जैन यांनी केले आहे.

