अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर….
![]()




अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर….
अमळनेर प्रतिनिधी
अंमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल नुकताच लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आला.हिंदी दिवस निमित्त तालुका स्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.यात ग्रामीण क्षेत्रातील 32 माध्यमिक विद्यालय तर शहरी क्षेत्रातील 19 माध्यमिक विद्यालया मधील सुमारे चार हजार सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल नुकताच लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आला. लकी ड्रॉ वेळी सु.आ.पाटील आश्रम शाळा पिंपळे येथील वरिष्ठ शिक्षक सतिष कांगणे यांनी बाह्य परीक्षक आणि म्हणून काम पाहिले.
तालुकास्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल याप्रमाणे
शहरी क्षेत्र-लहान गट(इ.5वी ते 7वी)
प्रथम-अश्मित चतुर पाटील(सेंट मेरी स्कूल,अमळनेर) द्वितीय – गौरी नाना कोळी(इंदिरा गांधी विद्यामंदिर अमळनेर),तृतीय– जयदीप भावसिंग राजपूत(स्वामी विवेकानंद स्कूल,अमळनेर), चतुर्थ– काझी अयमन असलमोद्दिन(अल-फैज उर्दू स्कूल,अमळनेर) पाचवे-श्रेयस ईश्वर माळी(साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर)
उत्तेजनार्थ-
दक्ष सुरेंद्र सुराणा(सायरादेवी बोहरा स्कूल अमळनेर),जागृती हेमराज पाटील(सावित्रीबाई फुले माध्य. विद्यालय,अंमळनेर),प्रथमेश दीपक पाटील(एन टी मुंदडा विद्या.अमळनेर)
शहरी क्षेत्र -मोठा गट(इ.8वी ते 10वी)
प्रथम- भूमिका अनिल अहिरे (माध्य.विद्यालय अमळनेर), द्वितीय दक्षेश पवन शिसोदे (पी.बी.ए.स्कूल अमळनेर) तृतीय-साक्षी मोहन जाधव(साने गुरुजी कन्या हाय. अमळनेर) चतुर्थ- नयन भैय्यासाहेब पाटील (साने गुरुजी नूतन माध्य. विद्यालय अमळनेर), पाचवे- गायत्री गणेश वानखेडे (लोकमान्य विद्यालय अमळनेर)
उत्तेजनार्थ
पूर्वा विनोद शिंदे (पी एन मुंदडा हायस्कूल अमळनेर) रुद्राणी स्वप्निल अमृतकर (डी.आर.कन्या हाय. अमळनेर),मित ललित शिंपी (न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल अमळनेर)
ग्रामीण क्षेत्र-लहान गट(इ.5वी ते 7वी )
प्रथम-विनय अनिल पाटील,(क. पा.सार्वजनिक विद्या.,सारबेटे), द्वितीय-स्वामी रमेश पाटील (पं.नेहरू विद्यालय,फाफोरे,) तृतीय -हेमंत प्रदीपनाथ पाटील-(एकात्मता विद्यालय,शहापूर),चतुर्थ -ललित श्रावण राठोड,(एस.जी.विद्यालय, भरवस),पाचवे-कोमल लक्ष्मण राठोड (माध्यमिक विद्यालय,रणाईचे)
उत्तेजनार्थ-
सृष्टी राहुल पाटील (सु.ही.मुंदडे हाय.मारवड),लावण्या सुनील पाटील(बी.वाय चौधरी हाय,शिरसाळे),कामिनी प्रकाश सोनार(एस एस पाटील विद्यालय,लोंढवे),दर्शन निळकंठ पाटील(बालाजी विद्या,गांधली -पिळोदे),तेजस्विनी गंगासागर वानखेडे, (उदय माध्य.विद्यालय झाडी).
ग्रामीण क्षेत्र -मोठा गट(इ.8वी ते 10वी )
प्रथम-वर्षा प्रकाश धनगर,(अनिल पाटील विद्यालय,मंगरूळ),द्वितीय लीना रमेश चिंचोरे(के.पी.सोनार विद्यालय जैतपीर) तृतीय-हर्षल बबनराव पाटील(शारदा विद्यालय कळमसरे), चतुर्थ- कुंदन किरण सपकाळे(माध्यमिक विद्यालय निंभोरा)
पाचवे- महेश सुभाष राठोड (माध्य.आश्रम शाळा,रणाईचे)*
उत्तेजणार्थ- शिवानी मच्छिंद्र
नाथबुवा(सरस्वती विद्यालय पाडसे) गणेश दिपक जोशी(नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब),दिव्या कुंभार( आदर्श विद्यालय,अंमळगांव) अस्मिता चंद्रकांत भोई( माध्यमिक विद्या.दोधवद),रितेश प्रवीण पवार (दत्त माध्य.विद्यालय पातोंडा)
याप्रमाणे या स्पर्धेचा निकाल हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी घोषित केला. यावेळी अध्यक्ष आशिष शिंदे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर,सचिव दिलीप पाटील, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा कार्य.सदस्य एन आर चौधरी,प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन,मार्गदर्शक सोपान भवरे,डॉ. किरण निकम,सहसचिव कमलाकर संदानशिव, स्पर्धा समिती सदस्य मुनाफ तडवी,प्रदिप चौधरी, श्रीमती योगश्री पाटील,प्रशांत वंजारी,कविता मनोरे आदी उपस्थित होते.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे हिंदी मंडळाच्या वतीने सहर्ष अभिनंदन करण्यात आले.
ज्या हिंदी अध्यापकांनी आपल्या विद्यालयात स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले अशा हिंदी शिक्षकांना “कृतिशील हिंदी अध्यापक” म्हणून सन्मानित करण्यात येईल असे सर्वानुमते ठविण्यात आले.स्पर्धेतील विजेते सोडून मंडळाकडे नावे पाठविलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना शालेय स्तरीय विजेता म्हणून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला गेला.सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेच्या दुसऱ्या सत्रात डिसेंबर महिन्यात घेण्यात येईल असे सचिव दिलीप पाटील यांनी सांगितले.

