1 min read

सानेगुरुजी नुतन विदयालयातमुलांना प्रयोगशील अध्ययनाचे धडे

Loading

मुलांना प्रयोगशील अध्ययनाचे धडे

विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भीती व न्यूनगंड नष्ट करून शैक्षणिक कौशल्य, अध्ययन स्तर व क्षमतांची वृद्धी होण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत दहा दिवस गणितासाठी हा उपक्रम राबविण्याची संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू साहेब यांनी मांडली होती त्याअंतर्गत कृतीयुक्त पद्धतीचा वापर करून शैक्षणिक साहित्याचे साह्याने गणित सुलभ व रंजक पद्धतीने मांडून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याचा प्रयत्न साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक डी ए धनगर यांनी केला. दहा दिवस आनंददायी गणितासाठी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना मनोरंजनातून चौकोनाचे प्रकार व त्यांचे गुणधर्म समजावून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून तयार केलेले स्वनिर्मित शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून समजावून सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना गणिताच्या संकल्पना समजण्यासाठी अडचणी असतात. अनेक संकल्पना समजून देताना विद्यार्थ्यांना डोळ्यांनी बघता येत नसल्यामुळे गणित समजावून सांगणे शिक्षकांसाठी अवघड होते. त्यासाठी गणित शिक्षक डी ए धनगर यांनी टाकाऊ वस्तु पासून शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी साहित्य आणले. चौकोन तयार करण्यासाठी एकूण दहा घटकांची आवश्यकता असते परंतु विशिष्ट पाच घटक असले तरी चौकोन तयार करता येऊ शकतो हे प्रयोग पद्धतीने शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आणलेल्या शैक्षणिक साहित्यानुसार समांतरभुज चौकोन, आयत, चौरस, समभुज चौकोन, पतंग व समलंब चौकोन तयार केले. स्वतः तयार केलेल्या साहित्याच्या मदतीने प्रत्येक चौकोनाचा प्रकार त्यांनी स्वतः समजून घेतला व इतरांनाही समजावून सांगितला. त्यातूनच प्रत्येक चौकोनाचे गुणधर्म कसे असतात हे देखील समजून घेतले तसेच त्यांच्या बाजूंविषयी, कर्णां विषयी व कोनांविषयी माहिती व गुणधर्म जाणून घेतली. यातून विद्यार्थ्यांना प्रचंड आनंद मिळाला तसेच आपणही शैक्षणिक साहित्य निर्माण करू शकतो याचा अभिमानही विद्यार्थ्यांना जाणवला. न दिसणाऱ्या गणिताला प्रत्यक्ष बघून प्रत्येक गुणधर्माचा पडताळा देखील त्यांनी घेतला. संबंधित उपक्रमाला भेट देऊन संस्थेचे सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करायला लावून त्याची अनुभूती घेतली. सदर आनंददायी उपक्रमाला कृतिशीलतेची जोड दिल्यामुळे हा उपक्रम आनंददायी झाल्याचे मत मांडले. विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले. विद्यार्थ्यांनी देखील स्वयंस्फूर्तीने त्यांच्यासमोर एक एक प्रकार व गुणधर्म समजावून सांगितला. गटचर्चा करून सर्व पेरेंट लीडरने आपापल्या गटाला संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाबद्दल नागपूर विकास प्राधिकरणाचे संचालक कपिल पवार, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, अधिव्याख्याता डी बी साळुंखे,अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी, शुभम निकम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व उपक्रमशील शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *