कल्याण येथे १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न. कल्याण डोंबिवली विभागातील जास्तीत जास्त शाळांनी मैदानी खेळांमध्ये सहभाग घ्यावा::प्रकाश मुथा यांचे आवाहन
![]()
कल्याण येथे १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न. कल्याण डोंबिवली विभागातील जास्तीत जास्त शाळांनी मैदानी खेळांमध्ये सहभाग घ्यावा::प्रकाश मुथा यांचे आवाहन


ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ):कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित १४ वर्षाखालील विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२३-२४
स्पर्धेचे आयोजन सेठ हिराचंद मुथा स्कूल कोळीवली, उंबर्डे, कल्याण पश्चिम येथे करण्यात आले होते.
कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी मुथा स्कूल चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मुथा यांचा प्रमुख उपस्थितीत तसेच क्रीडा पर्यवेक्षक प्रविंण कांबळे , स्कूलच्या प्राचार्या सपना गादिया,उपप्राचार्या दीपाली कांबळे, कॉलेज चे प्राचार्या अनुजा ब्रम्हे स्पर्धा सहनियंत्रक कृष्णा माळी, विजय सिंग , खेळ प्रमुख सुभाष पंजे , पार्थ त्रिवेदी ,यांच्या हस्ते करण्यात आले, या स्पर्धेत पहिल्या दिवशी १४ वर्षाखालील मुले जवळ जवळ १०५ संघाचा विद्यार्थ्यांचा सहभाग होता स्पर्धा अतिशय सुंदर रित्या पार पाडली
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे स्थान आय ई एस गणेश नगर विद्यालय (माध्यमिक) मांडा टिटवाळा यांनी पटकावले,
दुसरा क्रमांक रविंद्र विद्यालय टिटवाळा,आणि तिसऱ्या क्रमांकाचे स्थान कॅप्टन ओक हायस्कूल कल्याण पश्चिम यांनी बाजी मारली.विजयी संघांचे आयोजक , संयोजक आणि कल्याण डोंबिवली क्रीडा विभागातर्फे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

