1 min read

प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या वतीने उदया राष्ट्रीय परिषद

Loading

प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या वतीने राष्ट्रीय परिषद

अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस अंतर्गत २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विषयाचे एकूण २५ शोधनिबंध व ७० गोषवारे पोस्टरसाठी प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक डॉ.भूषण चौधरी (विभागप्रमुख स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, क.ब.चौ.उ.म.वि.जळगा) तसेच संसाधन व्यक्ती म्हणून डॉ.तिरूनहरी युगंधर (तेलंगणा), डॉ. किरण डी.पवार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), डॉ.नफिसा पटेल (नवसारी, गुजरात) आणि डॉ.वृषाली वाघ (नवसारी, गुजरात) हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन श्री राणे सभागृहात संपन्न होणार आहे. मान्यवर संसाधन व्यक्तींचे लेक्चर्स व पोस्टर प्रदर्शन दुपारच्या सत्रात संपन्न होईल. तरी सर्वांनी यासाठी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. जैन,खा. शि.मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *