1 min read

वैजापूर येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न

Loading

वैजापूर येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न
[ वैजापूर तालुक्यात जिल्हा अधिवेशन घेण्याचा सर्वानुमते ठराव संमत ]
सम्राट अशोक विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत मदर तेरेसा मुलींचे वस्तीगृह,गंगापूर रोड, वैजापूर येथे आण्णासाहेब पा.ठेंगडे सर यांच्या इमारतीवर सुसज्ज नियोजीत व्यायामशाळेचे उद्घाटन तसेच सत्यशोधक समाज संघाची बैठक वैजापूर फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ज्येष्ठ अभ्यासू नेते राजेंद्र बागूल साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टिकाव व घनाचे घाव टाकून व्यायामशाळा उभारणीचे उद्घाटन करण्यात आले तद्नंतर बैठक सुरू झाली.प्रारंभी भाऊसाहेब जाधव (सेवानिवृत SDM), कृष्णा मालकर (सत्यशोधक संघटक) अरविंदजी खैरनार ( राज्याध्यक्ष,सत्यशोधक समाज संघ ) या प्रमुख अतिथींचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.राजेशजी गायकवाड यांची विनायकराव पाटील महाविद्यालयात विकास समितीच्या स्विकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
राजेंद्र बागूल यांनी प्रास्ताविकात महात्मा ज्योतिराव फुलेंची सत्यशोधक चळवळ मराठवाड्यात म्हणावी अशी पोहोचली नाही, त्यास जबाबदार कोण? परंतु यापुढे आपण सर्व मिळून सत्यशोधक चळवळ सर्व समाजापर्यंत जाऊन पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
भाऊसाहेब जाधव (सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी ) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री अरविंद खैरनार सर व कृष्णा मालकर सर (सत्यशोधक समाज संघ- महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब ठेंगडे यांच्या मदर तेरेसा मुलींच्या वस्तीगृहातील हॉलमध्ये बैठक उत्साहात संपन्न झाली.अरविंदजी खैरनार सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.फा.जॉन फर्स,कोपरनिकस,गॕलिलिओ,मार्टिन ल्युथर यांचे संदर्भ देत धर्मविरोधी कृती केल्यास काय घडले? यावर प्रकाश टाकला.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी वरील महान व्यक्तींचे संदर्भग्रंथ वाचून तीच भूमिका भारतात घेतली.महात्मा फुलेंनी आपल्या अनेक ग्रंथातून अंधश्रद्धा,रूढी परंपरांना,देवतांना आवाहन केले.सत्य व असत्य काय याची मांडणी केली.त्यामुळे अनेक पुरोहित मंडळींना विरोध करत धर्मविरोधी पण समाजहितासाठी महान असे सेवाकार्य केले.बहुजनांनाच नव्हे तर ब्राह्मण स्त्रियांना,अनाथ बालकांसाठी तसेच सर्वच समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. तेव्हा सनातन्यांचा प्रचंड विरोध असतानासुद्धा त्यांनी निर्भयतेने महान कार्य केले. महात्मा फुले यांच्या विचारांनी विचारांनी प्रभावित होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले गुरू मानले. ज्यांनी त्यांचे सत्यशोधक विचार अंगिकारले ते सुधारले. सत्यशोधक समाजाची चळवळ ग्रामीण भागात जाऊन सांगावी लागेल. प्रचार प्रसार कमी झाला आजही ही खंत आहे.सर्व बहुजन समाज अद्यापही जागृत झाला नाही. यासाठी कोणीतरी विडा उचलणे आवश्यक असते.म्हणून वैजापूर येथे सत्यशोधक समाज संघाचे अधिवेशन घेण्यात यावे म्हणजे महापुरूषांचे विचार सर्वांपर्यंत जातील.असे सूतोवाच अरविंदजी खैरनार यांनी केले.भाऊसाहेब जाधव यांनी समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात सत्यशोधक समाजाची बांधणी करताना आपले विचार प्रत्येक समाजास सांगितले पाहिजे.ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल याबद्दल मुद्देसूद विचार मांडले.स्वत:च्या कुटूंबापासून सत्यशोधक समाजाचे विचार स्विकारले पाहिजे यासाठी सकारात्मक मानसिकता तयार करावी लागेल.कृष्णा मालकर यांनी स्वतः सत्यशोधक समाजाचा विचार ८-१० वी च्या विद्यार्थ्यांना महापुरूषांचे पुस्तके देऊन शाळास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे म्हणजेच ते विद्यार्थी अभ्यासपूर्ण वाचन करतील व हळूहळू विचार पेरते होतील.यासाठी विद्यार्थीभिमुख उपक्रमशील अभ्यासू शिक्षकांची मदत घेऊन शाळेत विचार पोहोचवणे शक्य होईल व सत्यशोधक चळवळ बालपणी जर रूजली तर कायमची रूजेल अशी भूमिका मांडली.प्रास्ताविक राजेंद्र बागुल व प्रमोद पठारे यांनी सूत्रसंचालन तर जगन्नाथ गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
ज्ञानेश्वर जाधव,जयराम खाडे यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचे प्रखर सत्यशोधकी विचार मनोगतातून व्यक्त केले.बैठकीत सत्यशोधक समाजाची मराठवाड्यातील प्रचार प्रसार कमी होण्याची कारणे यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
नोव्हेंबर / डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर मधून सत्यशोधक समाजाचे जिल्हा अधिवेशन आयोजित करण्याचा सर्वानुमते संकल्प करण्यात आला.नियोजन व कार्यवाहीसाठी सत्यशोधक समाज कृती समिती सर्वानुमते वैजापूर गठीत करण्यात आली.समितीमध्ये निमंत्रक म्हणून सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे भाऊसाहेब जाधव ( सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी यांची स्तुत्य निवड तर सचिवपदी वैजापूरचे अण्णासाहेब पा.ठेंगडे सरांची निवड व अधिकृत संयोजक म्हणून उपस्थित सर्व क्रियाशील सभासदांची निवड करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बागुल, राजेश गायकवाड , बाळासाहेब गायकवाड,साहेबराव पडवळ,जगन्नाथ गायकवाड , दिलीप अनर्थे, शाहीर अशोक बागूल,प्रमोद पठारे ,प्रा.डी.एस.गायकवाड, ईरबा शिंदे , विलास त्रिभुवन, ज्ञानेश्वर जाधव , पुंडलिक गायकवाड,बाबासाहेब जगताप,जयराम खाडे,राजू शिणगारे कार्यकर्त्यांनी अमूल्य परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *