1 min read

प्रताप महाविद्यालय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजयी

Loading

प्रताप महाविद्यालय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजयी

अमळनेर प्रतिनिधी
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा मध्ये दि.२० ऑक्टोबर रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आंतरमहाविद्यालयीन खो खो आणि कबड्डी स्पर्धेत प्रताप महाविद्यालय मधील दोन्ही मुलांच्या संघांनी विजय मिळवला. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, तसेच कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.ए.बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, सर्व उप प्राचार्य, जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. संदीप नेरकर, (वरिष्ठ क्रीडा प्रमुख), शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सचिन पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *