अटल करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम
![]()

अटल करंडक स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाने जळगांव येथे संपन्न झालेल्या अटल करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले. काही मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे-
सांघिक प्रथम, अभिनय नैपुण्य- अभिनेता ( प्रथम)- अक्षर ठाकरे,
अभिनेत्री- (द्वितीय) मयुरी धनगर, संगीत (प्रथम)- प्रीतेश गजरे,
लेखन- (द्वितीय) नितीन सावळे,
दिग्दर्शन (प्रथम) – मयुरी धनगर यांनी यश संपादन केले. महाअंतिम फेरीसाठी महाविद्यालयाच्या संघाची निवड झाली आहे.
त्यानिमित्ताने विषयी कलावंत विद्यार्थ्यांचे खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ. जी.एच.निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कुलसचिव आबासाहेब मैराळे, कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे यांनी अभिनंदन व सत्कार केला.
यावेळी प्रा. नितीन पाटील, प्रा.डॉ.संदीप नेरकर (अधिसभा सदस्य), राजू सरवदे, प्रा. एस. ए. जोशी, डॉ. योगेश तोरवणे, प्रा. सुनील राजपूत, डॉ. जे.टी. साळवे उपस्थित होते. संघव्यवस्थापक म्हणून प्रा. किरण सूर्यवंशी,
प्रा. सुनिल राजपूत व प्रा आकाश पाटील यांनी भूमिका पार पाडली.

