तथागत बुद्धांचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही-लोकशाहीर
संभाजी भगत
![]()

तथागत बुद्धांचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही
संभाजी भगत
माणसांच्या जगण्याला सुखद आणि सुकर करणारी विचारधारा तथागत गौतम बुद्धांच्या धम्मात असून असून माणूस तत्त्वज्ञानाने प्रेरित झाला तर तो जागा होतो असा स्वानुभवाने जागा होणारा महत्तम क्रांतिकारक क्रांतिकारक तत्त्ववेत्ता तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारातून अनेक धर्म प्रेरणा घेतात बुद्धाचे गांभीर्य लक्षात घेतल्याशिवाय जगाला पर्याय नाही असे विचार धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकशाहीर संभाजी भगत बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे होते संभाजी भगत आपलं धम्मचक्र प्रवर्तनाची फलश्रुती एक चिंतन या विषयावर मत मांडताना पुढे म्हणाले पैशांपेक्षा माणसं महत्त्वाचे असून आजच्या दिवशी शेतकरी शेतीच्या अवजाराचे पूजन करतात शेतमजूर कष्टकरी श्रमिक यांचं असणार योगदान हे समाज व्यवस्थेला समजावून घेण्याची गरज असून आज राज्य संस्था हातात शस्त्र घेते आहे धर्मपिठे माणसाच्या हातात शस्त्र देते आहे तेव्हा माय माऊलीच्या बहिणीच्या गर्भातल्या गर्भाला बाहेर येण्याची भीती वाटू लागलेली आहे, भारतात हिंसेचे वाहक सत्तेत आहेत जे धर्मपिठाच्या माध्यमातून षडयंत्र रचत आहे अशा परिस्थितीला बदलविण्याची गरज आहे. एक काळ असा होता माऊलीचे खंदकात असणारे हात बुद्धाने बाहेर काढले शेणाचे हात पेनाला लावले हे डॉ. बाबासाहेबांनी समजावून सांगितले आणि परिस्थिती बदलली बाबासाहेबांच्या कृपेने करूनेचे काळीज मिळाले आणि बुध्द धम्माच्या वाटेने लेकरे वळाले. धम्मा पुढे अनेक आव्हाने आहेत आव्हाने मानवाला उजागर करणारी डॉ. बाबासाहेबांच्या लेकरांकडे आहे जन्माने बुद्ध होण्यापेक्षा विचाराने बौद्ध होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. विचार मंचावर डॉ.करीम सालार, प्रतिभाताई शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे, पूजा साळवे, संगीता माळी उपस्थित होते. विजयकुमार मौर्य,प्रा.डॉ.के.के.अहिरे, सुनील सोनवणे रमेश सोनवणे प्रकाश वानखेडे,बी.जी.बोदडे, श्रीकांत बाविस्कर,गोपाळ भालेराव,संकेत शिरसाठ,राजेंद्र पारे ,भिमराव अडकमोल,शिरीष अडकमोल,दिलीप सपकाळे,सोमा भालेराव, विश्वासराव मोरे, सतीश मोरे दिलीप शिरतुरे,सागर नन्नवरे ,चंद्रकांत ननवरे,महेंद्र केदारे यांचा सत्कार लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी तर आभार बापूराव पानपाटील यांनी मानले. डॉ. करीम सालार, प्रतिभाताई शिंदे, मुकुंद सपकाळे यांची याप्रसंगी समायोचित भाषणे झालीत.ममता दिलीप सपकाळे, प्रियंका सपकाळे, शुभांगी राजेंद्र सपकाळे यांनी गायीलेल्या त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

