रायगड मधील 20% अनुदान शिक्षकांना त्वरित मिळावे.. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण विभागास भेट
![]()

रायगड मधील 20% अनुदान शिक्षकांना त्वरित मिळावे.. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण विभागासभेट. *ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) वीस वर्षापासून अनुदानापासून वंचित असलेल्या माझ्या शिक्षक -शिक्षकेतर बांधवांना हक्काचा*
पगार दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे, म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जोरदार धडक दौरा सुरू केल्या आहे, ठाणे- पालघर नंतर रायगड जिल्ह्यातील 108 शिक्षक -शिक्षकेतरांना 20 टक्के अनुदान मंजूर झाले असून काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या आठ महिन्यापासून पगार अनुदान वितरित झालेले नव्हते
सदरच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मंत्रालय व शिक्षण संचालक कार्यालय व आयुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ६२१, पालघर जिल्ह्यातील 200, व रायगड जिल्ह्यातील 108 शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपूर्वी झालेच पाहिजेत म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून ठिकठिकाणी आंदोलन सुद्धा केली, व तात्काळ अडचणी सोडवले आहेत
रायगड जिल्ह्यातील शिक्षक- शिक्षकेतरांची दिवाळी सुद्धा गोड झाली पाहिजे म्हणून आज स्वतः ते रायगड जिल्हा परिषद अलिबाग या ठिकाणी उपस्थित राहून अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, तात्काळ तांत्रिक अडचणी सोडवून सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि दिवाळीपूर्वी शिक्षकांना पगार द्या असे धारेवर धरूनच आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले, त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व काम नीट पार पाडण्याचे आश्वासन दिले व दिवाळीपूर्वी पगार होतील असेही सांगितले
दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सर्व शाळांना अनुदानाचे आदेश मिळतील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर स्वतः सदर आदेश वाटप करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, तसेच पुढील प्रक्रिया, 20 टक्के अनुदानावरील वैयक्तिक मान्यता घेणे, वरिष्ठ लेखाधिकरण करून वेतन निश्चिती करून घेणे, शालार्थ आयडी मिळवून देणे इत्यादी कामे स्वतः आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर जातीने लक्ष देऊन करून घेणार आहेत
तसेच इतरही शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या व प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ गुरव मॅडम यांच्याशी प्राथमिक शिक्षकांचे विषय सुद्धा चर्चा करून तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले तसेच सिव्हिल सर्जन डॉक्टर श्री देव माने साहेब यांची भेट घेऊन प्रलंबित वैद्यकीय बिले तात्काळ मंजूर करण्यासाठी आदेश दिले
सदर प्रसंगी लकीचंद ठाकरे, संजय भगत , फरीदुल काझी , विनोद डाकी , नामदेव फापाळे , राहुल गायकवाड, वसीम , हनीफ सर, माछे सर व अन्य समस्या घेऊन मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित होते

