नवीन शिक्षक संघटनेचे “नामकरण” शिक्षक आमदार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
![]()

नवीन शिक्षक संघटनेचे “नामकरण” शिक्षक आमदार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर दिवस-रात्र काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करणाऱ्या शिक्षकांच्या मागणीनुसार आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये “महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना” असे संघटनेचे नाव फक्त घोषित करण्यात आले आहे सदर संघटना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,डिग्री कॉलेज,शिक्षकेतर कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी कार्य करणार आहे.
तसेच कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक वेळेला मला पाठिंबा दिलेल्या सर्व “मित्र संघटनांना” सोबत घेऊन काम करणार असे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले*
*दसऱ्याच्या सणानिमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा असल्याने सर्वांनाच आमंत्रित करता आले नाही, हस्ते परहस्ते ज्यांना निरोप मिळाला ते कार्यकर्ते उपस्थित राहिले होते, संघटनेमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी सर्व मित्रमंडळी, कार्यकर्ते यांना आमंत्रित करून भव्य मेळावा घेण्यात येणार असून संघटनेची ध्येय, धोरणे व दिशा ठरवण्यात येणार आहे.
सल्लागार रमेश जाधव सर, चंद्रकांत पवार सर, एल आर पाटील सर, गुलाब दवणे सर, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संघटना नामकरणाचा शुभारंभ केला, याप्रसंगी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहिती संपर्कप्रमुख विष्णू विशे यांनी दिली.

