श्रीमती.द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर,येथे हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे परीक्षेचे आयोजन..
![]()

श्रीमती.द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर,येथे हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे परीक्षेचे आयोजन..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक-22/10/2023 रोजी आमच्या श्रीमती.द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर,येथे हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेली हिंदी विषयाची परीक्षा घेण्यात आली आहे.परीक्षेला एकूण 136 विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यावेळी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थिनींना खाऊवाटपही केले. परीक्षेचे आयोजन सकाळ विभागातून श्रीमती योगेश्री मधुकर पाटील तसेच दुपार विभागातून श्रीमती प्रतिभा साबे यांनी केले. तसेच या विद्यार्थिनींना परीक्षेसाठी दररोज मधल्या सुट्टीत मार्गदर्शन वर्ग भरवले जात होते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना लेखन, व्याकरण,हस्ताक्षर तसेच भाषेतील बारकावे यासारख्या अनेक बाबी सखोल कळल्या व पुढील इयत्ता साठी मार्गदर्शक ठरल्या.

