विद्या विहार कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने अष्टमीला होमहवन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सहपत्निक घेतला आरतीचा लाभ…
![]()






विद्या विहार कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने अष्टमीला होमहवन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सहपत्निक घेतला आरतीचा लाभ…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
नवरात्रात अष्टमी पूजा करतांना होमहवन करण्याची प्रथा आहे. यज्ञ करण्यासाठी नितीन भावे गुरुजींनी मंत्रोच्चारण करुन हवन विधीला प्रारंभ करतात.देवीची प्रार्थना करुन संकल्प करतात.अशा पद्धतीने पाच जोडप्यांनी होमपूजन केले..
कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक आधार पाटील व सौ योगिता अशोक पाटील यांनी सहपत्निक आरती केली. नवरात्र उत्सवाचे आयोजक प्रविण रमेश पाटील, अध्यक्ष ,जयवंत पाटील, उपाध्यक्ष योगेश शिरसाट, सचिव मोहीत पवार व मंडळाचे पदाधिकारी व महीला भगिनी यांनी सत्कार केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्याकडून महीलांना रूद्राक्ष वाटप करण्यात आले.
मंडळाच्या वतीने लकी डा पद्धतीने काढून तिन महीलांना पैठणी साडी देण्यात आल्या..
प्रथम-कविता सपकाळे
द्वितीय-निर्मला संजय पाटील
तृतीय-लिना योगेश पाटील
गरबा उत्सव यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक प्रविण रमेश पाटील मंडळाचे अध्यक्ष जयंत बापूराव पाटील ,उपाध्यक्ष योगेश मधुकर शिरसाट ,सचीव मोहीत राजेंद्र पवार सदस्य सागर दगडू विसपुते,विजय येवले,अमोल दुसाने
दिनेश पाटील,भूषण पाटील,संजय पाटकरी प्रशांत देसाई, किरण अहिरे, कविश पाटील, विवेक पाटील, सनी पाटील, राज सोनवणे यांनी प्रयत्न केले. यावेळी विशेष उपस्थिती ग्रामसेवक मिलिंद संदानशिव,नितीन पाटील ग्रामसेवक, आर.डी.शिंदे,पत्रकार ईश्वर महाजन, शांताराम पाटील, प्रमोद पवार, ललीत चौधरी, संजय पोपट पाटील,रघूनाथ पाटील,विकास शेलकर,सिसोदे भाऊसाहेब,आबा चौधरी,
सह विदयाविहार काँलनी मित्र परीवार,संत गजानन महाराज परीवारातील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


