1 min read

कॉपीमुक्त परीक्षेसाठी पाल्यांना सजग करा.
डॉ.मिलिंद बागुल

Loading

कॉपीमुक्त परीक्षेसाठी पाल्यांना सजग करा.
डॉ.मिलिंद बागुल
भारतीय स्री पुरुषांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाच्या माध्यमातून असून ज्ञान प्राप्त करण्यासाठी परिश्रमाची, त्यागाची वेळप्रसंगी स्वतःला सवाल करीत ज्ञानाला आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी सार्वजनिक विद्यालयात जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून कॉपीमुक्त अभियान पालक सभेत मनोगत व्यक्त करताना केले. पालकांना आवाहन करताना त्यांनी कॉपीमुक्त अभियानाविषयी माहिती देत विद्यार्थी ज्ञानाला, शिक्षणाला, प्रामाणिकतेला केंद्रबिंदू मानून आपल्या जीवनाची वाटचाल समृद्ध करू शकतो त्यासाठी शालेय जीवनापासून त्याची जडणघडण ज्ञानाच्या माध्यमातूनच होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पर्यवेक्षक एल.जे पाटील यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे मत मांडले. एस.के.राणे राजपूत यांनी परीक्षेसंदर्भातील सूचना देऊन नियोजनाची माहिती दिली,या प्रसंगी पालक शिक्षक संघाच्या सचिव अनिता पाटील यांनी पालक शिक्षक संघाचे सहसचिव सुनील भोळे,अल्ताफ पिंजारी यांचे स्वागत केले.ज्योती भारुळे, असलम पिंजारी,अनिता अहिरे ह्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासा संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला.भावना चौधरी यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासा संदर्भात नियोजन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.बी.तायडे यांनी तर सूत्रसंचालन वृषाली चौधरी यांनी केले आभार एल.जे.भुगवदया यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *