1 min read

“ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सव उत्साहात साजरा”

Loading

“ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सव उत्साहात साजरा”
अमळनेर :- ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल (सी.बी.एस सी.) स्कूल येथे दांडीया व गरभा महोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रिस्कुल ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवला.
प्राचार्य श्री.नीरज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीची आरती व पूजनाने करण्यात आली.आरतीचा मान शाळेच्या प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक गरबा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *