1 min read

विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह निमित्ताने
होमगार्ड बांधवाचा झाला सत्कार

Loading

विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साह निमित्ताने
होमगार्ड बांधवाचा झाला सत्कार

उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या बांधव व भगिनींना दिले जाते रोख बक्षीस …

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
विदयाविहार काँलनी अमळनेर येथील नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे…
आज सामाजिक कार्यकर्ते विक्की जाधव यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नंतर पत्रकार ईश्वर महाजन यांनी त्यांचा बुके व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विविध सण उत्सव याच्यामध्ये प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या
होमगार्ड बांधव राहूल पाटील,विशाल पाटील या होमगार्ड यांचा सत्कार मंडळाचे सदस्य भाऊसाहेब विलास पवार,विकास महाजन यांनी केला.
आदर्श विदयाविहार काँलनी अमळनेर मंडळाच्या वतीने उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या
वैशाली गोसावी यांना बक्षीस सौ
बबिता पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
बापू सोनवणे व आर्यन जाधव यांचा ललीत चौधरी ,रघूनाथ पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
विचार विदयाविहार काँलनी मित्र मंडळाच्या वतीने पहील्या वर्षी शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. व काँलनीतील बंधू व भगिनी यामध्ये मोठा उत्साह आहे.
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बक्षीस देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले. विद्या विहार कॉलनीतील मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून महिला पुरुष,बालगोपाल यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सागर विसपुते बहारदार सुत्रसंचालन करत आहे..
गरबा उत्सव यशस्वी होण्यासाठी
कार्यक्रमाचे आयोजक प्रविण रमेश पाटील मंडळाचे अध्यक्ष जयंत बापूराव पाटील ,उपाध्यक्ष योगेश मधुकर शिरसाट
सचीव मोहीत राजेंद्र पवार सदस्य सागर दगडू विसपुते,विजय येवले,अमोल दुसाने
दिनेश पाटील,भूषण पाटील,संजय पाटकरी प्रशांत देसाई, किरण अहिरे, कविश पाटील, विवेक पाटील, सनी पाटील, राज सोनवणे
सह विदयाविहार काँलनी मित्र परीवारांचे सहकार्य लाभत आहे…

होमवहन करतांना ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *