1 min read

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मदतीने ठाणे जिल्हातील शिक्षकांची दिवाळी होणार साजरी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमच्यासाठी खरे देवदूत आहेत.सर्व शिक्षकांचा प्रतिक्रिया.

Loading

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मदतीने ठाणे जिल्हातील शिक्षकांची दिवाळी होणार साजरी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमच्यासाठी खरे देवदूत आहेत.सर्व शिक्षकांचा प्रतिक्रिया.

ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी )आज दिनांक 19.10.2023 रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पाठपुराव्याला अखेर आज यश आले, गेली 20 वर्षे विनाअनुदानावर काम करणाऱ्याला शिक्षकांना दिनांक 06.02.2023 रोजी अनुदान जाहीर झाले, परंतु शासनाच्या अटीमुळे ठाणे जिल्हातील अनेक शिक्षक अनुदानापासून वंचित होते, या सर्व शाळांन अनूदान आदेश आज दिल्या शिवाय घरी जाणार नाही आज सर्व शिक्षकांना न्याय दिल्या शिवाय मी आज शांत राहणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत दुपारी 02. वाजल्यापासून रात्री 09.00 वाजेपर्यंत आमदार म्हात्रे साहेबांनी धारणा धरून बसले होते, संपूर्ण प्रशासनाला कामाला लावत आज FIR ची प्रकीर्या पूर्ण करून ठाणे जिल्हातील सर्व अनूदानास पात्र असलेल्या शाळांना अनुदान देण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आणि आज शिक्षक आमदार म्हात्रे यांचा हस्ते 5 शाळांचे अनुदान आदेश वितरीत केले, उर्वरित सर्व शाळांचे आदेश उद्या आणि परवा सर्वांना मिळतील, अनूदान आदेश वितरीत करण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यामिक शिक्षणाधिकारी. ललिता दहितुले अधीक्षक संजय राऊत , यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यासमयी ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष. गणेश पाटील , सचिव. प्रवीण लोंढे, संपर्क प्रमुख विष्णू विशे, गोकुळ पाटील, प्रशांत भामरे , सतीश ठाणगे , विलास जाधव , संदीप काळेकर , भास्कर देशमुख , लचाणे सर, अनिल पाटील, विजय राणे, प्रकाश मगर, शोएब शेख, रणजित भोईर आणि जवळ पास 150 ते 200 शिक्षक उपस्थीत होते.
*विनावेतन काम केलेल्या अनके शिक्षकांच्या घरी खऱ्या अर्थाने चूल आमदार म्हात्रे सरांच्या वतीने पेटली असून त्यांच्या घरी आज खरा दसरा आणि दिवाळी साजरी करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता प्रत्येक सर आमदार म्हात्रे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करत होते तर काही शिक्षक बांधव तुम्हीच आमचे साक्षात देव म्हणून हात जोडून सरांचे धन्यवाद व्यक्त करत होते.अशी माहिती संपर्क प्रमुख
विष्णू विशे यांनी आमचा प्रतिनिधींना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *