असोदा विद्यालयाचे कबड्डीत यश
![]()

असोदा विद्यालयाचे कबड्डीत यश
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा येथील मुलांच्या व मुलींच्या संघांनी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले तर रावेर येथे झालेल्या जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित किशोर गट निवड चाचणी स्पर्धेत सहभागी चाळीस संघातून तृतीय क्रमांक पटकावला. संघातील जूनेद खाटीक, साहिल पिंजारी, रोशन चव्हाण, विशाल गंगावणे, नितीन कुंभार, युवराज सपकाळे इत्यादी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.त्यामधील राज्य स्तरीय स्पर्धेसाठी संभाव्य संघात प्रथम वीस खेळाडूंमध्ये जूनेद खाटीक व साहिल पिंजारी या दोन खेळाडूंची निवड झाली. त्यांचे संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.त्याबद्दल खेळाडूंचा संस्थेच्या संचालक मंडळा मार्फत सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, सचिव कमळाकर सावदेकर, चेअरमन उध्दव पाटील, संचालक किशोर चौधरी, किशोर कोल्हे, वसंत चिरमाडे, सुनिल चौधरी, दिलीप महाजन, पंडित चौधरी, मुख्याध्यापक डॉ मिलिंद बागुल पर्यवेक्षक एल जे पाटील, क्रीडा शिक्षक प्रशांत कोल्हे, डी जी महाजन उपस्थित होते.

