1 min read

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विजयसिंह पवार….

Loading

श्री विजयसिंग आधारसिंग पवार
(उपशिक्षक) भिका यशोदा चौधरी हायस्कूल शिरसाळे तालुका अमळनेर
शिरसाळे सारख्या छोट्याशा गावात शिक्षकाची नोकरी करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील एकग्रता करिअर डेव्हेलोपमेंट पॉईंट या नावाने पहिले संपूर्णपणे मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र 2010 सालापासून सुरू केले. दर रविवारी गावातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची जाणीव जागृती निर्माण झाली त्याच बरोबर ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात एक प्रशस्त अभ्यासिका सुरू झाली दर रविवारी मोफत मार्गदर्शन व अभ्यासिकेचा परिणाम म्हणून गावातील 50 पेक्षा जास्त तरुण विविध शासकीय सेवांमध्ये दाखल झाले. या कार्यात अनेक सहकारी शिक्षक मित्र तसेच प्रशासनातील सन्माननीय अधिकारी व शिरसाळे ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले.
तसेच संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ व्हावा म्हणून पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या सहकार्याने ग्रंथालयात पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या नावाने एमपीएससी व यूपीएससी मार्गदर्शन वर्ग सुरू केले तर रविवारी या केंद्रातून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते यात अनेक तज्ञ मार्गदर्शक व प्रशासनातील सन्माननीय अधिकारी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात त्यामुळे या केंद्राचा लाभ शेकडो तरुणांना होत आहे प्रशस्त लायब्ररी दर्जेदार पुस्तके सर्व सोयीन युक्त मार्गदर्शन वर्ग ग्रंथालयाने उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यात स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत या केंद्राचा तरुणांना खूप फायदा होत आहे या केंद्रामार्फत मार्गदर्शन घेऊन विविध शासकीय सेवांमध्ये अनेक तरुण यशस्वी होत आहेत. यात वाचनालयाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. एक रुपया फी न घेता तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय ही एकमेव संस्था आहे.
या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचा लाभ दरवर्षी शेकडो विद्यार्थी घेत आहेत.

सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द…

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करतांना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा आज आदरणीय विजयसिंह पवार सरांचा वाढदिवस. अभिनंदन……🎂💐💐🎂🎂🎂 ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *