निसर्गाची बोली जपणारा रानकवी-ना.धों महानोर!
![]()
निसर्गाची बोली जपणारा रानकवी-ना.धों महानोर!
शंभू पाटील
निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी
मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर यांचे प्रतिपादन
शारदीय व्याख्यानमाला समारोपीय कार्यक्रमात महाराष्ट्रात गाजत असलेला
संगीतमय कार्यक्रम परिवर्तन-जळगाव निर्मित कविवर्य ना.धों.महानोर यांच्या गाण्यांचा ,कवितेचा कार्यक्रम झाला बहारदार…




अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निसर्गगीतं आणि कविता म्हणजे ना.धो. महानोर हे एक समीकरणच महाराष्ट्रात तयार झालं आहे. त्यांनी रचलेली कितीतरी गीतं महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या ओठी आहेत. वानगीदाखल सांगायचं तर, ‘नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ अशी अनेक गाणी वर्षानुवर्षं रसिकांच्या ओठी आहे .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे पहिले मंत्री ज्यांनी साहित्य क्षेत्राला दिशा दिली..
कवीच्या भेटीला जाणारा मुख्यमंत्री. पळासखेडे येथे आला.. शरदचंद्रजी पवार भवरलाल जैन नसते तर महानौर देशाला कळला नसता.. तेव्हा मंत्रिमंडळामध्ये साहित्य क्षेत्रातल्या माणसाला संधी दिली जायची पण आता साहित्य क्षेत्रातील माणसं दिसत नाही ही शोकांतिका आहे.
शरदचंद्रजी पवार, भवरलाल जैन यांनी महानोर यांना ताकद दिली. असे मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर आयोजित-
शारदीय व्याख्यानमाला समारोपीय कार्यक्रमात महाराष्ट्रात गाजत असलेला
संगीतमय कार्यक्रम परिवर्तन-जळगाव निर्मित कविवर्य ना.धों.महानोर यांच्या गाण्यांचा ,कवितेच्या कार्यक्रमात
शंभू पाटील यांनी सांगितले..
प्रमुख अतिथी शंभू पाटील, हर्षल पाटील
सुदीपता सरकार यांचा मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी केला.पाहुण्याचा परिचय व सुत्रसंचालन मंडळाचे सदस्य संदीप घोरपडे यांनी केले.
तर प्रस्ताविक डॉ जोशी म्हणाले कि मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने दरवर्षी शारदीय व्याख्यानमाला आयोजित केली जातात.मंडळाची १९५१ स्थापन झाली.,अमळनेरला १९७२ नंतर साहित्य संमेलनचा योग आला आहे. राज्यातील
साहित्यिकांची देवानघेवान होईल. असे सांगत कै पद्मश्री महानोर यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे .
तर कवी हर्षल पाटील म्हणाले की सानेगुरुजी ची भूमी,शेतकरी, कष्टकरी यांची भूमी आहे.साने गुरुजींनी सारा भारतीय समाज मंगलमय व्हावा यासाठी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न केले. जन्मभूमी कोकण तर कर्मभूमी खान्देश, यातून तयार झालेले हे मानवी रसायन सा-या महाराष्ट्रामध्ये, विशेषत: मुले व युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करणारे होते. अमळनेर येथे शिक्षक म्हणून काम करतांना आपण, आपला देश, आपली सांस्कृतिक बलस्थाने, मानवी समाजासमोर असलेले प्रश्न व त्यावरील उपाय या विशाल भूमिकेतून ते विद्यार्थ्यांवर संस्कार करत होते.व
साहित्य संमेलन मुळे अमळनेर चे देशाच्या नकाशात जाणार असे सांगितले.
परीवर्तन टिममधील सुदीपता सरकार,वरुन नेवे,सोनाली पाटील, योगेश पाटील,ऐश्वर्या परदेशी यांनी कविता सादर केली.
गुंतले प्राण ह्या रानात माझे
फाटकी हि झोपडी काळीज माझे..
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!!” काय सुरेख विचार आहे.. कल्पना तर सुचण आणि ती साकारण्यासाठी शब्द सुचण या दोन्ही गोष्टींसाठी प्रतिभा गरजेची आहे… हि प्रतिभा खचितच महानोरांकडे आहे…
केशवसुतांनी निसर्गकवितांचं बीज लावलं.. बालकवींनी त्याला रुजायला, फुलायला मदत केली आणि महानोरांच्या काळात हे बीज बहरून आलं..
शंभू पाटील म्हणाले कि निसर्ग कवी ना.धो महानोर यांनी “जगला प्रेम अर्पावे”, “गंगा वाहू दे
निर्मळ” आणि “दिवेलागणीची वेळ”
यासह अनेक लोकप्रिय कविता आणि
गाणी लिहिली.याचबरोबर “एक होता
विदुषक”, “जैत रे जैत”, “सर्जा” सारख्या
मराठी चित्रपटांसाठीही गाणी
लिहिली.रानातल्या कविता, अजिंठा,
पानझड, पावसाळी कविता, पळसखेडची
गाणी हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह होते.
“मी रात टाकली, मी कात टाकली”,” ह्या
नभाने ह्या भुईला दान द्यावे” या गीताची
रचना त्यांनी केली.
कवी साहित्यिक रमेश पवार यांनी
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे..
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडुनी जावे..!!”
हि कविता सादर केली तर
सोनाली पाटील कविता सादर केली
मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना,
अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना,
कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना,
दुःख ओले, दोन अश्रू, माणसांचे माणसांना…”
वरून नेवे- अंगाई गित
हा कंठ दाटूनी आला हि कविता सादर केली.. दिग्दर्शक हर्षल पाटील-कविता
प्रेम कविता सादर केली. आरूषी जोशी यांनी जन्मापासून चे दु:ख हि कविता सादर केली.ऐश्वर्या परदेशी यांनी
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी, हि कविता सादर करत रसीक वर्ग मंत्रमुग्ध झाले…
शारदीय व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी चार दिवसापासून मेहनत मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी,उपाध्यक्ष श्यामकांतजी
भदाने, रमेश पवार, कार्यवाहक सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे व कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा डाँ पी.बी भराटे,
संदीप घोरपडे, प्रा डॉ सुरेश माहेश्वरी,
सौ वसुंधरा लांडगे, प्रा श्याम पवार ,श्रीमती स्नेहा एकतारे, बन्सीलाल भागवत, भैय्यासाहेब मगर, प्रा शीला पाटील, बजरंग अग्रवाल, अजय केले यांनी प्रयत्न केले..
चौकट
ना.धो.महानोर यांच्या कवितांचा बहारदार कार्यक्रमात अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे सहपत्निक उपस्थित होते, कवी,साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक
पत्रकार यांनी शेवटपर्यंत कार्यक्रम ऐकला.. मराठी वांग्मय मंडळाने उपस्थित असलेल्या रसिकांचे धन्यवाद व्यक्त केले..



