ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड
![]()

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड
ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी होत विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
दिनांक १६ऑक्टोंबर रोजी चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षे वयोगटातील शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या चुरशीच्या लढतीत ललिता पाटील स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजय खेचून आणला. शाळेच्या संघाचा टीम लीडर चि.अपूर्व सुभेदार याच्यासह रुद्र सुर्यवंशी, प्रथमेश शिरसोडे , रोहित वालेचा यांची विभागस्तरावर निवड झालेली आहे. या सर्वांना क्रिडा शिक्षक केदार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
विजयी संघाचे संस्थेचे संचालक श्री. पराग पाटील, प्राचार्य श्री. निरज चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन केले आहे.

