भूगोलातील आधुनिक अभ्यास पध्दती आत्मसात करणे ही काळाची गरज : डॉ. सावंत यांचे प्रतिपादन
![]()
भूगोलातील आधुनिक अभ्यास पध्दती आत्मसात करणे ही काळाची गरज : डॉ. सावंत यांचे प्रतिपादन
प्रताप महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषद संपन्न

अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक १८ रोजी रुसा अंतर्गत भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने “भूगोल शास्त्रातील आधुनिक अभ्यास” या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक योगेश मुंदडे तर अध्यक्ष संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, माजी प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी, किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय.व्ही. पाटील, कबचौ उमवि चे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी पाटील, अधिसभा डॉ. मंदा गावीत, डॉ. संदीप नेरकर,माझी भूगोल विभाग प्रमुख प्रा. बी.व्ही.देशमुख, कबचौ उमवि भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस.के.शेलार,सदस्य डॉ. अरविंद बडगुजर, डॉ. पी.डी.पाटील, डॉ. इरफान शेख, डॉ.राहुल इंगळे, डॉ. विक्रम आगोणे, डॉ.प्रकाश कोंका (बीड), आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. कल्पना पाटील, प्रा.डॉ.जयंत पटवर्धन, प्रा. डॉ. विजय मांटे, महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक तसेच भारताच्या विविध विद्यापीठातून आणि विविध महाविद्यालयातून आलेले भूगोल विषयाचे संशोधक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात बीजभाषक म्हणून डॉ. नंदकुमार सावंत (गोवा) हे होते. ते यावेळी म्हणाले की, “ एकविसाव्या शतकातील भूगोलाचे वाढते महत्व व आधुनिक भूगोलातील अभ्यास पद्धती” यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. या सत्राध्यक्ष प्राचार्य वाय.व्ही.पाटील होते.
तिसऱ्या सत्रात डॉ.सुधाकर परदेशी यांनी “भूगोलातील दूरस्थ संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचे महत्व” या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. या सत्राचे सत्राध्यक्ष डॉ. एस.आर.चौधरी होते.
चौथ्या सत्रात भूगोल विषयातील संशोधकांनी संशोधन पेपर सादर केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मोहन वैंशपायन तर अहवाल लेखन डॉ. अरविंद बडगुजर यांनी केले. या सत्राचे संचालन डॉ. पी.डी.पाटील यांनी केले.
समारोपीय सत्राचे अध्यक्षीय मनोगत डॉ.ए.बी.जैन यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी जी. एस. हायस्कूलचे चेअरमन हरी भिका वाणी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. कैलास निळे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार डॉ. किरण गावीत तर समारोपीय सत्राचे आभार डॉ. प्रमोद चौधरी व डॉ. महेंद्र महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

