शारदीय व्याख्यानमालेचे वक्ते डॉ अभिनय दरवडे यांचा अमळनेरला महाजन परीवाराने केला जंगी सत्कार
![]()
शारदीय व्याख्यानमालेचे वक्ते डॉ अभिनय दरवडे यांचा झाला अमळनेरला सासरी जंगी सत्कार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- मराठी वाड्:मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत काल धुळे येथील बालरोग तज्ञ ,कवी, गायक ,अभिनेता समुपदेशक डॉ अभिनय दरवडे धुळे यांनी सांगा जगायचं तरी कसं!! या विषयावर श्रोत्यांना खूप काही चांगली माहिती दिली श्रोते मंत्रमुग्ध झाले…
जावई सासऱ्यांच्या तालुक्यात आले आहेत हे पाहून सासरकडची सर्व मंडळी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थिती होती…
स्व.ढोमण बुधा महाजन,देवाजी बुधा,या परिवारातील शिवलाल बुधा महाजन यांचे नात जावाई व प्रकाश शिवलाल महाजन यांचे जावाई डाॅ. अभिनय दरवडे यांचा सत्कार करतांना महाजन परिवारातील सदस्य बाळासाहेब महाजन मा नगरसेवक सौ.मिरा बाई महाजन मा. नगरसेविका,विद्यमान नगरसेविका सौ. ज्योती महाजन,धनजंय महाजन,अतुल महाजन,युवराज महाजन,योगेश महाजन,सौ.लता महाजन सौ.सोनाली महाजन,सौ.पुनम महाजन,गणेश माळी सर,सौ.ज्योती गणेश माळी उपस्थित होते..
सासरकडील सत्कार व प्रेम पाहून वक्ते व जावई डॉ दरवडे हे भारावून गेलेत…


