1 min read

हिंगोली जिल्हा राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हाचा दणदणीत विजय

Loading

हिंगोली जिल्हा राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हाचा दणदणीत विजय
राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी साहिल भोईर,सूजीत भोईर,वेदांत पाटील मित पाटील, हर्षल पाटील यांची निवड. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) दिनांक 14/10/2023 ते 16/10/2023 या तीन दिवसीय हिंगोली जिल्हा आयोजित 17 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कॅप्टन साहिल भोईर यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हा विरुध्द धुळे जिल्हा संघास 2 विकेट गमावून दणदणीत विजय मिळवला, अंतिम सामन्यात स्वयंम पाटील सामनावीर म्हणून मानकरी ठरला. मालिकावीर म्हणून वेदांत पाटील यांचा गौरव करण्यात आला. ,तसेच दोंडाईचा धुळे येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खालील खेळाडूची निवड करण्यात आली आहे. साहिल भोईर, सूजीत भोईर, वेदांत पाटील, मित पाटील, हर्षल पाटील त्याबद्दल सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक ,कोच शुभम दळवी व भूषण चव्हाण, ठाणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव लक्ष्मण इंगळे यांचे ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री मा. जगन्नाथ पाटील, मा. विष्णू म्हात्रे, प्रगती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.ज्योती पोहणे, कॉलेज अधीक्षक गुरुनाथ पाटील या सर्व मान्यवरांनी खेळाडू चे अभिनंदन केले व धुळे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *