शिक्षण विस्तार अधिकारी पि.डी धनगर यांचे दीर्घ आजाराने निधन
![]()

शिक्षण विस्तार अधिकारी पि.डी धनगर यांचे दीर्घ आजाराने निधन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पि.डी धनगर(५७) यांचे दीर्घ आजाराने धुळे येथे विघ्नहर्ता रुग्णालयात निधन झाले..
शिक्षण विस्तारी अधिकारी असतांना अमळनेर पंचायत समितीमध्ये गुणवत्ता वाढ व विकास यासाठी त्यांनी प्राधान्यक्रम दिला. ते अत्यंत नम्र व मितभाषी स्वभावाचे होते त्यांचे अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या काळात त्यांनी कुणालाही दुखावले नाही. आपल्या मुलांना योग्य शिक्षणाचे बाळकडू देत त्यांना स्वावलंबी केले.
दोंडाईचा येथील रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आहेत..
अत्ययात्रेला अमळनेर, धुळे दोंडाईचा, जळगाव ,जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते.
त्यांच्या निधनाबद्दल शोक अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील, धनगर समाजाचे पदाधिकारी दशरथ लांडगे,सौ वसुंधरा लांडगे, डी.ए धनगर ,भागवत गुरूजी,युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष
प्रा अशोक पवार,सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीप घोरपडे,साहित्यिक प्रा.डॉ रमेशमाने,साहित्यिक रमेश पवार, व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, मुख्याध्यापक संघाचे प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे तुषार पाटील
हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे पदाधिकारी,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी,यांनी शोक व्यक्त केला.

