1 min read

प्रताप महाविद्यालय ज्युडो व फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रथम

Loading

प्रताप महाविद्यालय ज्युडो व फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रथम

अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागाद्वारे प्रताप महाविद्यालय येथे दि.१६ ऑक्टोबर रोजी आंतरमहाविद्यालय ज्युडो आणि फ्लोअरबॉल स्पर्धेचे आयोजण करण्यात आले होते. यात प्रताप महाविद्यालयाने बाजी मारली.
या प्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी. जैन होते. यावेळी प्रा. डॉ. विजय पाटील (सचिव एरंडोल विभाग), डॉ. संदीप नेरकर (जिमखाना प्रमुख व सिनेट सदस्य), डॉ. शैलेश पाटील, प्रा. किशोर वाघ, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा. दीपक पाटील, प्रा. शिसोदिया, प्रा. डॉ. संजय सोनवणे, प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल सर, प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रशिक्षक सचिन वाघ, यज्ञेश जगताप, जयेश जगताप, पंच उपस्थित होते. स्पर्धेसाठी एकूण नऊ संघ सहभागी होते.
ज्युडो स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाने प्रथम क्रमांक, बी. पी. आर्ट चाळीसगाव द्वितीय आणि एरंडोल महाविद्यालय तृतीय क्रमांक मिळविला. तसेच फ्लोअर बॉलमध्ये प्रताप महाविद्यालय मुले विजयी तर मुली उपविजयी ठरल्या.
या यशाबद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष मा. डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य. डॉ. ए.बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, मा. सर्व उप प्राचार्य, डॉ. संदीप नेरकर (जिमखाना प्रमुख) यांनी कौतुक केले.
डॉ. सचिन पाटील सर (क्रीडा विभाग प्रमुख वरिष्ठ), कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा प्रमुख प्रा. अमृत अग्रवाल, अर्चना पाटील, सचिन वाघ सर, जगदीश शिंगाने यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *